किनवट तालुक्यातील घनपूर-इंजेगाव नाक्यावर तेलंगाना व महाराष्ट्राची सिमा बंद - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 28 March 2020

किनवट तालुक्यातील घनपूर-इंजेगाव नाक्यावर तेलंगाना व महाराष्ट्राची सिमा बंद

किनवट :-महाराष्ट्र तेलंगाणा राज्याच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्याची सरहद्द आणि तेलंगाणातील आदिलाबाद जिल्ह्यातील बोथ तालुक्याच्या सरहद्दीवर कोरोना या संसर्ग आजाराच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राज्याची पोलीस यंत्रणा सज्ज आहे.
       किनवट (मराठवाडा) व बोथ (तेलंगाणा) तालुक्याच्या घनपूर-ईंजेगांव या सरहद्दीवर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही सीमा बंद करण्यात आली आहे. नागरीकांची ये-जा थांबवण्यासाठी ही सीमा बंद केल्याचे वृत्त आहे. अन्नधान्य, दूध, भाजीपाला, फळफळावळ, आरोग्य विषयक औषधींसह जीवनावश्यक वस्तुंचीच ने-आन करण्यासाठीच सरकारने मुभा दिल्याची माहिती दि.२६ मार्च २०२० रोजी कर्तव्यावर असलेले पोलीस हेडकाँन्स्टेबल पी.लिंगन्ना दिली. यावेळी त्यांच्या सोबत बीट आॅफीसर पी.बापुराव, पोलीस शिपाई एन. तुकाराम व के. किशन पोलीस शिपाई हे कर्तव्य बजावतांना दित होते. वनविभाग व आरोग्य पथकही तैनात असल्याचे पी.लिंगन्ना यांनी सांगितले.
तर याच सरहद्दीवर किनवट पोलीस ठाण्यातील पो.हे.काँ.माधवराव फड, पोलीस शिपाई संजय रांजणे, बोधडी बु. वनविभागातील वनमजूर मेटकर हजर होते. तेलंगाणातील सिमेवर कर्तव्यावर असलेल्यांना जेवन व्यवस्था व्यवस्थीत असल्याचे सांगितले. किनवटच्या सीमेवरील कर्मचा-यांना मात्र भोजनाची सोय त्यांच्या त्यांच्या पातळीवर करीत असल्याचे दिसले. किनवट मधिल अन्नदात्यांनी थोडेफार औदार्य दाखऊन या सीमेवर जीवाची पर्वा न करता सेवा बजावणा-या सिल्लेदारांपर्यंत पोहोचण्याची नितांत गरज आहे.

No comments:

Post a Comment

Pages