नांदेड दि. 22 :- नांदेड शहरातील पिरबुरहान भागातील 64 वर्षीय कोरोना संशयित एका रुग्णाचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे. जनतेने घाबरुन न जाता, घरातच राहून कोरोना विरुद्धच्या लढ्यात सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
आतापर्यंत एकूण क्वारंटाईन असणाऱ्या नागरिकांची संख्या 754 आहे. यामधील क्वारंटाईन कालावधी पूर्ण झालेली 242 असून सध्या निरीक्षणाखाली असलेले 65 नागरिक आहेत. यापैकी दवाखान्यात क्वारंटाईनमध्ये 119 नागरिक आहेत. तसेच घरीच क्वारंटाईनमध्ये असलेले 635 अशी संख्या आहे.
आज तपासणीसाठी 51 नागरिकांचे नमुने घेतले होते. आजपर्यंत एकुण 500 नमुने तपासणी झाले आहेत. यापैकी 444 नमुने निगेटीव्ह आले असून 50 नमुने तपासणी अहवाल येणे बाकी आहे. तसेच 5 नमुने नाकारण्यात आली आहेत.
जिल्ह्यात बाहेरुन आलेले एकूण प्रवासी 78 हजार 150 असून त्यांना त्यांच्या घरीच राहण्याचा सल्ला दिलेला आहे. तसेच त्यांच्या हातावर शिक्केही मारण्यात आले आहेत, अशी माहिती आरोग्य विभाग नांदेड यांनी दिली आहे.
No comments:
Post a Comment