नांदेड दि. 22 :- जिल्ह्यातील रस्त्यांची मंजूर व प्रलंबित कामे दर्जेदार गुणवत्तापूर्ण विहित कालावधीत पूर्ण झाली पाहिजेत, असे निर्देश राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
नांदेड जिल्ह्यातील मंजूर व प्रगती पथावरील, प्रलंबित, प्रस्ताविक नवीन कामांचा आढावा बैठक पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन सभागृहात (काल दि. 21 रोजी) संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते.
बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अविनाश धोंडगे जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी तसेच जिल्ह्यातील कार्यकारी अभियंता, कंत्राटदार यांची यावेळी उपस्थिती होती.
पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी जिल्ह्यातील पूल पूर्ण करण्यासाठी आवश्यक निधी व त्याची यादी सादर करण्याबाबत निर्देश दिले. राष्ट्रीय महामार्गाचा कामाचा आढावा घेऊन कोल्हार ते नरसापुर 57 कि.मी. काम वीस टक्के झाले असून मुदत संपून एक वर्ष झाले तरी ती कामे अपूर्ण आहेत सदर कामे तात्काळ पूर्ण करावीत. वसमत ते नांदेड 30 किमी पैकी 14 किमी रस्त्याचे काम 50 टक्के झाले आहे. नांदेड-बारड-भोकर-म्हैसा रस्त्याचे काम सुरू असून बारसगाव ते राहटीपर्यंन्ताचे काम लॉकडाऊनमुळे प्रलंबित आह. रस्ता कामासाठी डांबर कमी होते ते निदर्शनास आणून देणे आवश्यक होते त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यवाही करावी असे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी यावेळी सांगितले.
भोकर ते राहाटी पर्यंतचे काम पूर्ण करावे. त्यापुढील काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास प्राधिकरण यांच्याकडे देण्यात यावे. यासाठी मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम यांच्याशी चर्चा करावी. उपविभागीय अधिकारी भोकर यांच्याशीही समन्वय ठेवून तीन कामांच्या मोजण्याचे काम पूर्ण करावे. नांदेड ते जळकोट रस्त्याचे कामाच्या मोबदला देण्यासंदर्भात शेतकऱ्यांनी कामे अडवले असून तीन कामे रस्त्याची शिल्लक आहेत. या कामांची सविस्तर माहिती सादर करावी. लखमापुर चार पॉईंट 50 किमीचे काम परमिट आहे, तेंव्हा या कामासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्या स्तरावर प्रलंबित कामांचा आढावा घ्याव. नांदेड-वारंगा बायपास रस्ता 30 मीटर शासकीय जमीन आहे, परंतु रस्ता करण्यास विरोध होत असल्यास रस्त्याचे काम पोलिस संरक्षणात सुरू करण्याचे निर्देश पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी यावेळी दिले.
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे 184 कामे प्रगतिपथावर आहेत. ती अठरा महिन्यांच्या कालावधीत पूर्ण करावयाची आहेत. कामाची प्रगती 25 टक्के असून तसेच 2015 व 2016 मधील मुखेड, हातराळचे काम अपूर्ण आहेत. या कामाचे अंदाजित रक्कम दहा कोटी रुपये आहे. हे काम चार वर्षापासून अपूर्ण आहे ही बाब गंभीर आहे. तेंव्हा संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची कार्यवाही करणे अपेक्षित आहे. याबाबत या कामाची बैठक पुढील आठवड्यात घेऊन अहवाल सादर करावा करावा, असेही निर्देश पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी यावेळी दिले.
ज्या-ज्या ठिकाणी प्रलंबित कामे आहेत त्या-त्या ठिकाणी उपविभागीय अधिकारी यांच्याशी चर्चा करून सदरच्या अडचणी सोडविण्यात याव्यात. शंभर गाव काकांडी येथील रस्त्याच्या कामासाठी संपादनाची कार्यवाही तात्काळ करण्यात यावी. शासकीय कामासाठी लागणारे लोखंड, सिमेंट, डांबर उपलब्ध होण्यासाठी लॉकडाऊनमध्ये दुकाने उघडी ठेवली आहेत. ट्रक वाहतुकीसाठी पोलिस विभागाकडून पास देण्यात येत आहेत. जिल्हाधिकारी यांनी शासकीय प्रकल्पाच्या रस्त्याच्या कामास परवानगी दिली आहे.
ज्या कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे व जी कामे झाली आहेत तेंव्हा निधी देत असतांना केलेल्या कामाची गुणवत्ता तपासून निधी उपलब्ध करुन दयावा. शासकीय रस्ते, पूल, इमारतीची कामे विहित कालावधीत चांगले गुणवत्तेने व मुदतीत पूर्ण होतील याकडे लक्ष देण्यात यावे. कंत्राटदार यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले.
तसेच मजूरांची संख्या् जास्तच असल्यामस कामाच्याा ठिकाणीच जवेणाची व निवासाची स्वणच्छेतागृहे, मास्कम, सॅनिटायझर इत्या्दी उपलब्ध् करुन देण्यायत यावी. सोशल डिस्टीन्से पाळले जाईल याचीही दक्षता घेण्याडत यावी, असेही पालकमंत्री अशोक चव्हाउण यांनी बैठकीत सुचना दिल्या.
यावेळी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मदत म्हणून जीजी कंट्रक्शन श्री कदम यांनी मुख्यमंत्री सहायता निधीस दोन लाख एक हजार रुपयाचा निधी धनादेश पालकमंत्री अशोक चव्हाण यांना सुपूर्द केला.
No comments:
Post a Comment