जनता लॉकडाऊन झाली ; प्रश्न जगण्याची बाकी - प्रल्हाद चव्हाण - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 9 April 2020

जनता लॉकडाऊन झाली ; प्रश्न जगण्याची बाकी - प्रल्हाद चव्हाण

जनता लाॅगडाऊना झाली ; प्रश्न जगण्याचा बाकी                                         प्रल्हाद चव्हाण


वाई (बाजार) : पंधरवड्याचा काळ उलटून गेला आहे जनता लाॅगडाऊन होऊन .अशाही ही परिस्थितीत दिवस काढत आहे शासनाच्या आव्हानाला प्रतिसाद देत शासन निर्णय शिरोधार्य मानून स्तब्द झाली परंतु प्रश्न बाकी आहे तो जगण्याचा.                    कोरोना सारख्या महाभयंकर रोगाने अख्खा  जग कवेत समावून घेतले असताना महाराष्ट्रात पण रुग्णांची संख्या दिवसा गणित वाढतच असताना अशा या रोगावर मात कशी करायची हा एकमेव प्रश्न सर्वांसमोर आवासून उभा असताना या संसर्गजन्य रोगांना रोखण्यासाठी एकच पर्याय आहे हे तो सोशल डिस्टन्स हाच एकमेव पर्याय असताना मग शासनाने,आरोग्य तज्ञांनी दिलेल्या सूचनेचे काटेकोर पालन करीत सर्वसामान्य पासून उच्च वर्गिया पर्यंत सर्व जनता स्तब्ध झाली आहे.जणू काही शाळेतील विद्यार्थी प्रार्थनेला उभे राहतात व शिक्षक सूचना देतो सावधान जशी काही सावधान ची सुचना येथे विद्यार्थी सावध होतात त्याचप्रमाणे जनता सावधान झाली आहे . यामुळे दळणवळण, व्यवहार ,व्यवसाय ठप्प पडली आहेत जो तो आहे त्या परिस्थितीत आहे पण हे चालणार किती दिवस अशा परिस्थितीत किती काळ मुकाबला करू शकतो हा प्रश्न आहे ज्यांचे हातावर पोट आहे त्यांचे काय? शेतकरी-शेतमजूर करतील तरी काय ? फेरीवाले ,गाडीवाल्याचे कसे असे एक ना अनेक प्रश्न आ वासून उभे आहे . शासनाने लाॅगडाउन नंतर अनेक घोषणा केल्या मात्र त्या सर्व हवेतच विरळलया  चे सध्या तरी चित्र आहे. जरी महाकाय संकट आ वासून उभा असला तरी त्याच्या मुकाबला करण्यासाठी आपण सक्षम आहोत का हे पण तपासावे लागणार आहे ."भुके पेठ और बिना हत्यार जंग जीती नही जाती" त्याप्रमाणे सेनापतिच्या आदेशाची आम्ही नागरिक कितीही तत्परतेने पालन केली तरी दारुगोळा व हत्यारच नसल्यास लढायचे तरी कुणाच्या भरोशाने हे पाहणे गरजेचे आहे. शत्रूतर ताकदवर आहेच .अद्याप ग्रामीण भागातील  जनता राशन पासून दूर आहे,ना यांच्या खात्यावर 2000 ,ना दवाखान्यात आरोग्य विभागात लागणाऱ्या सुविधा मग मुकाबला करायचा तरी कसा. अशा अनेक समस्या सर्वसामान्य नागरिकांसमोर आहे प्रशासन त्यांच्या परीने प्रयत्नाची पराकाष्टा करतो आहे तरीपण ते मात्र अपुरेच म्हणावे लागेल ज्या रोज मराच्या गरजा आहे ते आहेतच  त्या  घरी असल्याने कमी होणार नाही त्या ज्या हव्या आहेत त्या हव्याच मग लाॅगडाऊन   असले काय की आणखी काही या सर्व बाबीचा विचार करता प्रश्न  जगण्याचा पुणा अनुत्तरीतच आहे.

No comments:

Post a Comment

Pages