प्रासंगिक अयोध्या : बुद्धकालीन साकेत :- सोमनाथ नरवडे - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday, 24 May 2020

प्रासंगिक अयोध्या : बुद्धकालीन साकेत :- सोमनाथ नरवडे



रामाचे राज्य हे अयोध्येत होते असे रामायणा  मधे सांगितले आहे आणि ही अयोध्या सरयू नदीच्या काठावर होती असे सांगितले जाते.परंतु सपाटीकरणाच काम करत असताना आवशेष, बुध्द मूर्ती, इतर अनेक गोष्टी सापडत आहेत त्यामूळेजनतेच्या मनात प्रश्न निर्माण होण स्वाभाविकआहे.
याबाबतचा लेखाजोखा करण्याच्या हा लेख लिहिला आहे.  अयोध्येला बुद्धाने भेट दिल्याचे पुरावे आहेत. इसवी सन पूर्व सहाव्या शतकात तथागत बुद्ध येथे आले होते.तेव्हा तिला साकेत या नावाने ओळखले जायचे.हि अयोध्या नेमकी कशी तयार झाली याची काही उदाहरणे सुद्धा आहेत . इ. सन पाचव्या शतकात कालिदास नावाचा कवी होवून गेला त्याने " रघुवंश " नावाचे महाकाव्य लिहिले. यामधे हा कवी या स्थानाचे नाव कधी अयोध्या तर कधी साकेत असे उल्लेख करतो, त्यावेळी मात्र प्रश्न निर्माण होतो तो असा कि हे स्थान बौद्धांचे प्रसिद्ध महानगर व मोठे व्यापारी केंद्र साकेत तर नसावे ?
यासाठी बौद्धांचे साकेत कसे होते हे देखील पाहू या.

               " बुद्धपूर्व काळात भारत सोळा जनपदांमध्ये विभागला होता ती जनपदे अशी होती.  काशी, कोसल, अंग, मगध, वज्जि, मल्ल, चेदी , वत्स, कुरु , पंचाल, मत्स्य, सुरसेन ,अस्सक ,अवंती, गंधार आणि कम्बोज . यामध्ये अनेक शहरे आणि निगम  व गावे  होती परंतु त्यावेळी महानगरे फक्त सहा होती ती अशी -  चंपा ,राजगृह, श्रावस्ती, साकेत, कोशांबी आणि वाराणशी. याकाळात बुद्धाचे महापरीनिर्वाण होण्यापुर्वी आनंद याने तथागत बुद्धानां या महानगरामध्ये धम्मोपदेशाकरीता जाण्याची विनंती देखील केली होती {दिघनिकाय  १६. ५. १७. }

तथागत बुद्ध आपल्या धम्माचा प्रचारा करीता सतत ४५ वर्षे चारिका भ्रमण करीत राहिले आणि ज्या ज्या ठिकाणी भगवान बुद्ध गेले आहेत त्याच्यां नोंदी त्रिपिटका मध्ये सापडतात . त्यात साकेत च्या हि नोंदी आहेत.
कोसल वासीय ब्राह्मण बावरी साधना करीत थेट दक्षिण पथामधील गोदावरी नदीच्या तीरावर अस्सक नावाच्या स्थानाजवळ आश्रम करून राहत होता त्याने ऐकले होते कि गौतम गृहत्याग करून श्रमण होवून सम्यक बुद्ध झाला आहे . त्याने  बुद्धांची भेट घेण्यासाठी आपले सोळा शिष्य ज्या मार्गाने गेले , त्यातील प्रमुख शहरांची नावे आहेत प्रतिष्ठान , महिष्मती ,उज्जैन , गोनद्ध , वेदिसं, वनसह्य, कोसंबी, साकेत आणि श्रावस्ती  म्हणजे दक्षिणेकडून उत्तरेकडे जाणाऱ्या  मार्गावर साकेत लागत होते . आणि नंतर श्रावस्ती वरील माहिती व मार्गाच्या नोंदी सुत्तानितापातातील पारायणवग्ग मधील वत्थुगाथेत { ३६. ३७. ३८. } उपलब्ध आहेत येथे साकेत च्या सबंधित नोंदींचा विचार करणे आवश्यक आहे. विनयपिठका मध्ये श्रावस्ती आणि साकेत यांचा मार्ग सांगितला आहे कारण भिक्षु साकेत वरूनच श्रावस्ती ला जायचे .
आनंद यांच्याकडे असणारे अतिरिक्त चीवर सारीपुत्त यांना देण्यासाठी ते साकेत मध्ये गेले होते . तसेच पाथेय्यक भिख्खू बुद्धाबरोबर वर्षावास घालवावा म्हणून श्रावस्ती ला जाण्यास निघाले परंतु वेळेवर न पोहचल्याने ते साकेत मधेच राहिले कारण वर्षाकालात भिक्षुनां प्रवास करण्यास मनाई होती हा संघाचा नियम होता , तेव्हा ते असे हि म्हणाले कि तथागत आमच्यापासून सहा योजन दूर आहेत परंतु आम्हाला तथागत यांचे दर्शन घेता येत नाही . या विचाराने ते खिन्न झाले होते. महावग्ग मध्ये अश्या नोंदी सापडतात
आणि महत्वाची गोष्ट म्हणजे साकेत शहर हे सरयू नदीच्या तीरावर वसलेले होते कारण याच तीरावर अंजन वनात भगवान बुद्ध आणि त्यांचे शिष्य थांबले होते.(पाठ 1)जय भीम

सोमनाथ नरवडे श्रमिक वसाहत विश्रांतवाडी पुणे

No comments:

Post a Comment

Pages