किनवट,दि.२ : कोरोना विषाणूच्या पार्श्वभुमिवर किनवट व माहूर तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालये व दवाखाने निर्जंतुकीकरण करण्यासाठी या सर्व ठिकाणी निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात यावी, अशी सूचना आ.भीमराव केराम यांनी सहाय्यक जिल्हाधिका-यांना केली आहे.
आमदार भीमराव केराम यांनी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा किनवटचे उपविभागीय अधिकारी अभिनव गोयल यांना नुकत्याच दिलेल्या लेखी पत्रात नमूद केले की, वर्तमान परिस्थितीत कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी (आपल्या मार्गदर्शनाखाली) शासनस्तरावर आरोग्य, पोलीस, ग्रामसेवक, तलाठी, शिक्षकांसह इतर कार्यालयीन कर्मचारी दिवसरात्र मेहनतीने उपाययोजना प्रतिबंध करीत आहे. तथापि, दोन्ही तालुक्यात बाहेर गावाहून येणा-या स्थानिकांची संख्या वाढलेली दिसत आहे. त्यामुळे वेळीच खबरदारीचे उपाय करणे अत्यंत गरजेचे असून वेळीच खबरदारी म्हणून दोन्ही तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालये, पोलीस ठाणे, दवाखान्यांसह परिसराची तातडीने सोडीयम हायड्रोक्लोराईड ने फवारणी करून निर्जंतुकीकरण करणे अत्यंत गरजेचे बनले आहे. जेणे करून कर्मचारी व त्यांचे कुटुंबिय सुरक्षित राहतील. त्यासाठी किनवट व माहूर तालुक्यातील वरील सर्व ठिकाणचे निर्जंतुकीकरण फवारणी करण्याच्या सूचना आ. केराम यांनी केल्या आहेत.
Saturday 2 May 2020
Home
तालुका
किनवट व माहूर तालुक्यातील शासकीय कार्यालये व दवाखान्यांचे निर्जंतुकीकरण करा - आ. केराम यांनी केली सहा. जिल्हाधिकां-यांना सूचना .
किनवट व माहूर तालुक्यातील शासकीय कार्यालये व दवाखान्यांचे निर्जंतुकीकरण करा - आ. केराम यांनी केली सहा. जिल्हाधिकां-यांना सूचना .
Tags
# तालुका
Share This
सम्यक मिलिंद सर्पे
तालुका
Labels:
तालुका
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.
No comments:
Post a Comment