"अजिंठा नाट्यलेणी", बुद्धाच्या जीवधावरील अप्रतिम चार नाटक - प्रा.डाॅ.प्रकाश मोगले - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday, 23 June 2020

"अजिंठा नाट्यलेणी", बुद्धाच्या जीवधावरील अप्रतिम चार नाटक - प्रा.डाॅ.प्रकाश मोगले


मराठीतील थोर नाटककार प्रेमानंद गज्वी यांच्या संकल्पनेतून साकार झालेली अजिंठा  नाट्यलेणी. अजिंठा लेण्या या कला,संस्कृतीचा जागतिक वारसा,ठेवा असलेल्या लेण्या. या लेण्या बघायला देश परदेशातून हजारो लोकं येतात. कला संस्कृतीचा अप्रतिम नमुना बघून समृद्ध होतात.आनंदीत होतात.  ही कला बघण्यासाठी,समजून घेण्यासाठी  " बोधी नाट्य परिषदेने " दोन दिवसांचा  अजिंठा— वेरूळ अभ्यास दौरा आयोजित केला.यात भगवान हिरे,स्वप्निल गांगुर्डे, अरूण मिरजकर,सांध्या आणि प्रेमानंद गज्वी  सहभागी झालेले होते. अशोक हंडोरे यांनी या लेण्यांचा अभ्यास अगोदरच केलेला होता.  या अभ्यासातून  नवं काही घडवता येइल का? काही निर्मिती करता येइल का? या  बोधी प्रेरणेतून अजिंठा नाट्यलेणी तील चार नाट्यलेणी निर्माण झालेली आहेत.  असा विचार कल्पक विचारांच्या  बोधीलाच सुचू शकतो. मराठी भाषेतीलच नव्हे तर एकुणच भारतिय भाषेतील हा आगळा प्रयोग असेल. पण मराठी माणसाच्या करंट्या मनोवृत्तीमुळे,समीक्षकांच्या ऊदासिनतेमुळे हा प्रयोग आणि ही  महत्वाची नाटयलेणी कट करून दुर्लक्षीत ठेवण्यात आली.          यात अशोक हंडोरे लिखित  नागपद्म,स्वप्निल गांगुर्डे लिखित   ...आणि धम्म, अरूण मिरजकर लिखित मिशन 29 आणि प्रेमानंद गज्वी लिखित द बुद्धा ही चार नाट्यलेणी आहेत. विषय,आशय एकच असूनही हरेकाच्या कलेकडे,कलाकृतीकडे पाहाण्याच्या वेगवेगळ्या दृष्टिकोणामुळे ही चारही नाटके मनाची पकड घेतात. मनावर गारूड करतात. अंत: करणाचा गाभारा ऊजळून टाकतात. नाटक ही जशी निर्मिती असते तशीच ती रचनाही आसते. कलेसोबत कारागिरीलाही महत्व असते. शिवाय नाटक ही प्रायोगिक कला असल्यामुळे रंगमंचाच्या मर्यादित अवकाशात, प्रेक्षकांना नाट्यगृहाकडे वळायला भाग पाडणारे नाट्यलेखक कुशल कलावंतच असावे लागतात. बोधी नाट्यचळवळ ही रंजनापेक्षा प्रबोधनाला अधिक महत्व देणारी असली तरी शेवटी नाटक बघायला लोकांची पावलं  थियटरकडे वळली पाहिजेत,हे नाट्यकर्मींना विसरून चालणार नाही.  1.  नागपद्म या नाटकात अजिंठातील चित्रांचा,शिल्पांचा अन्वयार्थ कसा लावायचा यावरून  कमर्शियल आर्टिस्ट  असलेला अथर्व नि कलेचा अभ्यासक संशोधक असलेला महेंद्र या दोघांतील संघर्ष  ऊत्तम रीतीने साकार झालेला आहे. बुद्ध तत्वज्ञानाला विकृत करू  बघणार्या अथर्वची हार नि महेंद्रची जित  झालेली दाखवली आहे.स्नेहा चे व्यक्तीचित्रनही छान जमले आहे.  2.  ...आणि धम्म मध्ये केंद्रिय सचिवालयातील बाई जेलमधील कैद्यांच्या मदतीने अजिंठा महोत्सवात सादर करण्यासाठी बुद्धाच्या जीवन प्रसंगावर  नाटक  बसवण्याचा  प्रयत्न करते. बुद्धाचे जीवन सादर करणारे खुनी  गुन्हेगार असलेले कलावंत त्यांच्यातील चांगुलपणाला फुंकर घालताच मानवी, होऊ लागलेले आहेत.देशपांडेसारख्या चार खून केलेल्या नि देलमधून पळून जाण्याचा प्रयत्न केलेल्या गुन्हेगारालाही केल्या कर्माचा त्यांना पश्चाताप होऊ लागला आहे. यातही जेलर नि बाईचा जबरदस्त संघर्ष आलेला आहे.               3. मिशन 29 मध्ये जपान मधील सू ही तरूणी जॉकली नि डॉ.शास्त्री यांच्या अंतरराष्ट्रीय कटात सहभागी होते नि अजिंठ्यातील 29 लेण्या डायनामाईटने ऊध्वस्त करण्याचा प्लॉन आखते. ईतिहासाचा प्राध्यापक असलेला राहूल तिच्यातील सद्विवेकाला साद घालत तिला शेवटी सांगतो की अजिठाची प्रतिकृती जॉकलीच्या नि शास्त्रीच्या  मदतीने अमेरिकेत बनवली जात आहे.जपानमध्ये नाही.    अमेरिका अजिंठाच्या प्रतिकृतीमुळे   जगाचे सांस्कृतीक केंद्र होणार. ही वस्तुस्थिती कळल्यानंतर, सू ची फसगत होते.या निराशेतून ती साईनाईड खाऊन जीव देते.राहूलच्या  हुशारीमुळे, सावधगिरीमुळे अजिंठा लेण्या विध्वंसापासून वाचतात. 4. द.बुद्धा हे प्रेमानंद गज्वी यांचे नाटक. राहूल,यशोधरा आणि बुद्ध या तिनच पात्राकरवी बुद्धाच्या समग्र जीवनाचा वेध घेण्याचा यशस्वी प्रयत्न नाटककाराने केलेला आहे. काव्यात्म शब्दकळा  आणि चिंतणाची  खोली  लाभल्यमुळे हे सर्व नाटक थेट भिडते. काळजाला स्पर्श करते. या नाटकात  गज्वींनी बुद्धाच्या जन्मासंबंधी काही आख्यायिका,अंधश्रद्धा दूर केलेल्या आहेत. ऊदा. बुद्ध जन्मल्याबरोबर सात पावलं चालले, बुद्धाने भिक्कूनी संघावर अधिकच्या अन्यायकारक अटी लादल्या.ईत्यादी.                                                         अजिंठा वेरूळच नव्हे तर कुठल्याही लेण्या, ऐतिहासिक स्थळं कसे पाहावेत  ,कुठल्यादृष्टिकोणातून पाहावेत,याचीही बरीच माहिती या पुस्तकातून मिळते. बुद्धाचे जीवन हीच एक जागतिक दर्जाची कलाकृती आहे. असं हे पुस्तक वाचून वाटू लागते. ते  पाहातांना,समजून   घेतांना आपल्या मनाचा गाभाराही ऊजळून निघतो.  बुद्धाच्या जीवनावरील अप्रतिम चार नाटकं एकत्र पाहिल्याचे,वाचल्याचे समाधान मिळते. हे काय कमी आहे?























































No comments:

Post a Comment

Pages