कोरोना आपत्ती,दैनंदिन प्राथमिक शिक्षणापासून दुरावत चाललेला विद्यार्थी आणि अण्णाभाऊ साठे जयंतीचे औचित्त साधून शैक्षणिक साहित्याचे वाटप.. - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday, 30 August 2020

कोरोना आपत्ती,दैनंदिन प्राथमिक शिक्षणापासून दुरावत चाललेला विद्यार्थी आणि अण्णाभाऊ साठे जयंतीचे औचित्त साधून शैक्षणिक साहित्याचे वाटप..




     मौजे.बरबडा ता.नायगाव जि.नांदेड येथे दिनांक 30 ऑगस्ट रोजी  दरवर्षी मोठ्या संख्येने आणि मोठ्या उत्साहात सार्वजनिक रित्या अण्णाभाऊ साठे जयंती साजरी होते पण यंदा कोरोनाच्या संकटामुळे ही जयंती सार्वजनिक रित्या करता आली नाही म्ह्णून छोटेखानिच कोरोना नियमांचे पालन करत ही जयंती मोठ्या उत्साहात एका आगळ्यावेगळ्या उपकाराने साजरी करण्यात आली.
  लॉकडाऊनच्या काळात करोडो विध्यार्थ्यांचे मग ते प्राथमिक शिक्षण घेणारे असो व माध्यमिक अथवा इतरही या सर्वांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे.आजचा प्राथमिक,बालभारतीत शिक्षण घेणारा सर्वसमान्य विद्यार्थी शिक्षणापासून मोठ्या प्रमाणात दुरावत चाललेला आहे कारण त्या विद्यार्थ्याचे नातेच शिक्षणापासून दूर चालले आहे,कित्येकांचे आई-वडील अडाणी असल्यामुळे व सद्य काळात आर्थिक परिस्थिती नसताना विध्यार्थ्यांना लॉकडाऊन काळात कसलेच शैक्षणिक साहित्य पुरवू शकत नाहीत.
   याला अनुसरूनच एक सामाजिक उपक्रम म्ह्णून अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्त साधत बरबडा नगरीतील युवा सामाजिक कार्यकर्ते मा.सतीश हणमंते यांच्या मदतीने व संघर्ष ग्रुप बरबडा यांच्या वतीने बरबडा नगरीचे सरपंच आदरणीय बालाजी मदेवाड सर,गंगाधर बडूरे सर,किरण हणमंते सर,माधव माचनवाड यांच्या हस्ते विध्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले... 
   या कार्यक्रमाला बरबडा नगरीचे सरपंच आदरणीय बालाजी मदेवाड सर,शिवसेना नेते गंगाधर बडूरे सर, सामाजिक कार्यकर्ते किरण सर हणमंते,माधव माचनवाड,आनंदा सूर्यतळ,वंचितचे बाळासाहेब एडके,संघर्ष ग्रुपचे सदस्य व समस्त मातंग समाज उपस्थित होता.

  हा उपक्रम अतिशय प्रशांसादायी व स्वागतार्ह आहे अशे उद्गार अण्णाभाऊ साठे जयंतीमंडळाकडून काढण्यात आले कारण महापुरुषांच्या जयंतीनिमित्त शैक्षणिक साहित्याचे वाटप हेच महापुरुषांना खऱ्या अर्थाने अभिवादन आहे.

No comments:

Post a Comment

Pages