मुंबई दि.27 - केंद्रियराज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी लॉकडाऊनच्या कठीण काळात गरीब गरजूंना केलेल्या मदत कार्याला पाहून शिवसेने चे चेंबूर मधील उपशाखाप्रमुख राजेश गुप्ता एव्हढे प्रभावित झाले की त्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात जाहीर प्रवेश केला. बांद्रा येथील संविधान निवासस्थानी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रियराज्यमंत्री ना रामदास आठवले यांची भेट घेऊन शिवसेनेचे उपशाखाप्रमुख राजेश गुप्ता यांनी रिपब्लिकन पक्षात जाहीर प्रवेश केला. रिपाइं चे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे; जिल्हा अध्यक्ष सिद्धार्थ कासारे; तालुका अध्यक्ष महादेव साळवे; अनिस पठाण; साहेबराव ससाने यांच्या नेतृत्वात राजेश गुप्ता यांनी रिपाइं त जाहीर प्रवेश केला . यावेळी रिपाइं चे कामु पवार; सोपान खंडागळे; राजू पुजारी; सुभाष किरवले; संजय इंगळे; अशोक साबळे; सुभाष साळवे; राजू शेंडगे; दीपक गायकवाड; योगेश भालेराव; बाळा दंडवते; सुनिल सदाफुलें; रवी गायकवाड आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.
लॉकडाऊनच्या काळात सर्व रोजगार बंद असल्याने हातावर पोट असणाऱ्या गरिबांचे कामगारांना दिवस ढकलणे कठीण झाले होते. लोकांनां अन्नधान्य मिळत नव्हते अशा कठीण काळात ना रामदास आठवले यांनी आपल्या निवासस्थानी गरीब गरजूंना सतत 3 महिने भोजनदान दिले.अन्नधान्य देऊन मदत केली. त्यांचे हे माणुसकीचे काम बघून मला प्रेरणा मिळाली आणि मी ही माझ्या पूर्ण क्षमतेने माझ्या भागात गरिबांना मदत केली. त्यामुळे ना रामदास आठवले यांचे नेतृत्व मला भावल्यामुळे मी शिवसेने चे उपशाखाप्रमुख पद सोडुन रिपब्लिकन पक्षात प्रवेश घेतला अशी माहिती राजेश गुप्ता यांनी दिली.
No comments:
Post a Comment