पाच वेळा नापास झाला पण जिद्द सोडली नाही! अंगनवाडी सेविकेचा मुलगा झाला आयएएस - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday, 7 August 2020

पाच वेळा नापास झाला पण जिद्द सोडली नाही! अंगनवाडी सेविकेचा मुलगा झाला आयएएस



उमरगा :
प्रत्येकाची अनेक स्वप्न असतात. पण हि स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी त्या स्वप्नांना मेहनतीची जोड लागते. याच मेहनतीच्या जोरावर उमरगा येथील एकूरगा गावातील अशित नामदेव कांबळेने यूपीएससीच्या परीक्षेत यश मिळवले आहे.

एकुरगा येथील अशितने केंद्रिय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परिक्षेत देशात ६६ वा क्रमांक पटकावला आहे. या अगोदर अशितने पाच वेळा युपीएसीसीची परिक्षा दिली होती. पण त्याला यश सहाव्या प्रयत्नात मिळाले.

कितीही वेळेस हारलो. तरी प्रयत्नांनी यश नक्कीच मिळतेच. असे काही अशितच्या कहाणीतून शिकायला मिळते. वडिल नामदेव कांबळे हे एस.टी. मध्ये मेकॅनिकचे काम करत होते. पण ते सध्या सेवानिवृत्त आहेत.

अशित एका सामान्य कुटूंबामध्ये जन्मला होता. पण त्याची स्वप्न मोठी होती. त्याच स्वप्नांना त्याने मेहनतीची साथ दिली आणि हे घवघवीत यश मिळवले. एका सामान्य कुटुंबातील तरुणाने हे यश मिळविल्याने त्याचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

अशितची आई अंगणवाडी सेविका आहे. अशितचे प्राथमिक शिक्षण एकुरगा येथिल जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. माध्यमिक शिक्षण शिवशक्ती विद्यालयात झाले. तर महाविद्यालयीन शिक्षण महात्मा गांधी विद्यालय, अहमदपूर येथे पूर्ण झाले.
बारावी नंतर पदवीसाठी पुणे येथील विश्वकर्मा ऑफ टेकनॉलॉजी या शिक्षण संस्थेत मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी प्रवेश घेतला. पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.

याच दरम्यान भारतीय प्रशासन सेवेच्या परीक्षेत तालुक्यातील जवळगा बेट येथील निलेश श्रीकांत गायकवाड हे राष्ट्रीय पातळीवरून ७५२ रँकने उत्तीर्ण झाले आहेत. त्यांना पाहून अशितने देखील हि परीक्षा देण्याचा निर्णय घेतला.

पण यासाठी त्याला खुप कठोर परिश्रम करावे लागणार होते. त्याने त्यासाठी तयारी सुरु केली. अशितने दिल्ली येथील आंबेडकरवादी मिशन येथे स्पर्धा परिक्षेची तयारी केली. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सहाव्या प्रयत्नात त्यांनी हे यश खेचून आणले आहे.

२०१३ पासून अशित स्पर्धा परिक्षेची तयारी करीत होता. पण २०२० मध्ये सहाव्या प्रयत्नात त्याला हे यश मिळाले आहे. या कालावधीमध्ये त्याने या परिक्षेसाठी खुप मेहनत घेतली. स्वत:ला अनेक गोष्टींपासून लांब ठेवले.

अशितला जेव्हा या यशाबद्दल विचारण्यात आले असता तो म्हणाला की, ‘मागील सहा महिन्यांपूर्वी माझी आय.एफ.एस. परीक्षेत निवड झाली होती. आता आय. ए. एस. परिक्षेतील निकालाने आनंदित झालो आहे. परिक्षा कठीण असल्यातरी “कष्ट हेच भांडवल ” याचा मार्गच यशाकडे नेतो. याचा अनुभव आला.’

ग्रामीण भागातील मुलांसाठी अशित प्रेरणा बनला आहे. तुम्ही हि स्वप्न पाहा. पण त्या स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी मेहनतीची जोड द्या. त्यासोबत ते स्वप्न पुर्ण होण्याची वाट पाहण्यासाठी तुमच्याकडे तसाच संयम देखील हवा.

No comments:

Post a Comment

Pages