राज्य सरकारच्या मदत घोषणेचे स्वागत,पण मदत तोकडी : अर्जुन आडे - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 25 October 2020

राज्य सरकारच्या मदत घोषणेचे स्वागत,पण मदत तोकडी : अर्जुन आडे

 किनवट,ता.२५ : राज्यात अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने केंद्राच्या निकषांपेक्षा थोडी अधिकची तरतूद करून शेतकऱ्यांना मदतीची घोषणा केली.याबद्दल किसान सभेकडून सरकारचे स्वागत. मात्र, पावसाने झालेले नुकसान पाहता ही मदत कमी असून त्यात वाढ करावी व दोन हेक्टरची  मर्यादाही काढून टाकावी,अशी मागणी अखिल भारतीय किसान सभेचे राज्य कार्याध्यक्ष अर्जुन आडे यांनी केली आहे. 

   आडे हे "मिडलपाथ",शी बोलतांना म्हणाले की, परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे ज्या प्रकारे  व ज्या प्रमाणात नुकसान झाले ते पाहता पिंकांच्या नुकसान भरपाईसाठी हेक्टरी १० हजार रुपये व फळ पिकांसाठी हेक्टरी २५ हजार रुपये ही मदत अत्यल्प आहे.दिवाळी गोड होणे दूरच,वाया गेलेल्या पिकांचा उत्पादन खर्चही या मदतीतून भरून निघणार नाही, हे वास्तव आहे.शिवाय मदत २ हेक्टरच्या मर्यादेतच मिळणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या शुकसानीचे स्वरूप पाहता अशी मर्यादा टाकणे अयोग्य आहे. राज्य सरकारने या बाबींचा विचार करून मदतीच्या रकमेत वाढ करावी व २ हेक्टरची मर्यादा काढून टाकावी.

   विमा कंपन्या शेतकऱ्यांना भरपाई देण्यात नेहमीच टाळाटाळ करत आलेल्या आहेत.आताच्या संकटातही विमाधारक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे कसे टाळता येईल असाच त्यांचा प्रयत्न दिसत आहे. राज्य व केंद्र सरकारच्या मलतीव्यतिरिक्त विमा कंपन्याकडूनही शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांची योग्य नुकसान भरपाई कशी मिळेल यासाठी सरकारच्या यंत्रणांनी गांभीर्याने प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचेही आडे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Pages