कंटेन्टमेन्ट झोनच्या बाहेरील व्यायामशाळा सुरु करण्यासाठी परवानगी.. - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 25 October 2020

कंटेन्टमेन्ट झोनच्या बाहेरील व्यायामशाळा सुरु करण्यासाठी परवानगी..

 

नांदेड (जिमाका) दि. 25 :- कंटेन्टमेन्ट झोनच्या बाहेरील व्यायामशाळा रविवार 25 ऑक्टोंबर 2020 पासून सुरु करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. कंटेन्टमेन्ट झोनच्या बाहेरील व्यायामशाळा सुरु करण्यासाठी (एसओपी) मानक कार्यप्रणाली / मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. त्यानुसार नांदेड जिल्ह्यातील कंटेन्टमेन्ट झोनच्या बाहेरील व्यायामशाळा 25 ऑक्टोंबर पासून सुरु करण्यासाठी  सोबतच्या परिशिष्ट 1 मध्ये नमुद (एसओपी) मानक कार्यप्रणाली / मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या अटीस अधीन राहुन परवानगी देण्यात आली आहे. 


संबंधीत व्यायामशाळांकडून परिशिष्ट 1 मध्ये नमूद (एसओपी) मानक कार्यप्रणाली, मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन केले जात असल्याबाबत तपासणी करण्याचे अधिकार  त्या-त्या क्षेत्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात आले आहेत. या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहिता 1860 (45) च्या कलम 188 आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथरोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी प्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी निर्गमीत केले आहेत. 


No comments:

Post a Comment

Pages