किनवट,दि.२५(बातमीदार) : भारतीय बौद्ध महासभा, तालुका शाखेच्या वतीने रविवारी(दि.२५)६४ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन शहर व परिसरात उत्साहात साजरा करण्यात आला.किनवट व गोकुंदा परिसरातल वार्ड व नगरामध्ये सकाळी ७:३०वाजता धम्मध्वजारोहण करण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय, गोकुंदा येथे सकाळी ठिक ८:३०वाजता धम्मध्वजारोहण व वंदना घेण्यात आली. किनवट येथील मुख्य कार्यक्रम डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात सकाळी दहा वाजता झाला.
तालुका अध्यक्ष अभियंता प्रशांत ठमके यांच्या हस्ते धम्मध्वजारोहण करण्यात आले.याप्रसंगी संस्कार विभागाच्या वतीने महेंद्र नरवाडे व अनिल उमरे यांनी सामुहिक वंदना घेतली.सिद्धार्थनगर येथील जेतवन बुद्ध विहारात सेवानिवृत्त गट शिक्षणाधिकारी गंगाधर कावळे यांच्याहस्ते पंचरंगी ध्वजारोहण करण्यात आले.सूत्रसंचालन प्रा.सुबोध सर्पे यांनी कले.२२ प्रतिज्ञा चे सामुदायिक वाचन महेंद्र नरवाडे यांनी केले.
यावेळी विनोद भरणे,देविदास मुनेश्वर, प्रा.अंबादास कांबळे,प्रा.पंजाब शेरे,उत्तम कानिंदे,प्रा.रविकांत सर्पे,प्राचार्या शुभांगी ठमके,संगिता पाटील,दिव्या सर्पे,सुरेश पाटील,दीपक ओंकार,मिलिंद धावारे,मल्लुजी येरेकार,राजाराम वाघमारे, एस.के.राऊत,वाठोरेसर,रुपेश मुनेश्वर, दिलिप पाटील,विवेक ओंकार, जी.एस.रायबोळे,सुनिल येरेकार,नितिन कावळे,मिलिंद सर्पे,रमेश मुनेश्वर, राजेश पाटील, यांच्यासहभारतीय बौद्ध महासभा, तालुका शाखा किनवटचे पदाधिकारी व विविध नगरातील पदाधिकारी ,बौद्ध उपासक- उपासिका यांनी शारीरिक अंतर ठेवून व शासनाचे नियमाचे पालन करुन कार्यक्रम यशस्वी केला,अशी माहिती बौद्ध महासभेचे तालुका सचिव आयु.महेंद्र नरवाडे यांनी दिली आहे.
No comments:
Post a Comment