कृषी उत्पन्न बाजार समिती, नवा मोंढा चे खुले मैदान फटका विक्रिस परवानगी देऊ नये; स्वप्नील इंगळे पाटील - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 25 October 2020

कृषी उत्पन्न बाजार समिती, नवा मोंढा चे खुले मैदान फटका विक्रिस परवानगी देऊ नये; स्वप्नील इंगळे पाटील

 नांदेड : नोव्हेंबर महिन्यात येणाऱ्या दिवाळी या सणा निमित्य नांदेड मध्ये मोठ्या प्रमाणात फटाके विक्री होत असते.नांदेड च्या फटाके व्यापाऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती, नवा मोंढ्याच्या खुल्या मैदानावरील फटाका विक्रिस परवानगी मागितली आहे. त्यांना परवानगी देण्यात येऊ नये, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे प्रदेश सदस्य स्वप्नील इंगळे यांनी एका निवेदनाद्वारे सर्व संबंधितांकडे नुकतीच केली आहे

                    

   निवेदनात नमुद केले आहे की,             नांदेड येथील नवा मोंढा कृषी उत्पन्न बाजार समितीचे खुले मैदान  व्यापाऱ्यांनी फटाके विक्रीसाठी द्यावे, यासाठी परवानगी मागितली आहे. परंतु, हे मैदान मध्य वस्तीत असून जवळच उज्वल गॅस एजन्सी चे गोडाऊन  आहे. तसेच हाकेच्या अंतरावर कोचिंग क्लासेल चालतात. त्यामुळे येथे विद्यार्थ्यांची 

नेहमी वर्दळ असते.चारही बाजूने अत्यन्त दाट वस्तीदेखील आहे.

औरंगाबाद येथील मागच्या वर्षिसारख्या घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये. असे झाल्यास जीवितहानी वित्तहानी होण्याची शक्यताही नाकारता येणार नाही. खरेदीसाठी आलेल्या लोकांच्या गर्दीमुळे कोरोना संसर्ग वाढू शकतो.त्यामुळे फटाका विक्री घातक ठरू शकते,असे इंगळे यांनी निवेदनात म्हटले आहे.सदरील मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी ,पोलीस अधिक्षक यांना दिल्याचे त्यांनी सांगितले..

No comments:

Post a Comment

Pages