स्त्री अभ्यास विषय पदवी स्तरावर अनिवार्य करा.. कुलगुरू प्रमोद येवले यांना दिले निवेदन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 20 October 2020

स्त्री अभ्यास विषय पदवी स्तरावर अनिवार्य करा.. कुलगुरू प्रमोद येवले यांना दिले निवेदन

 


औरंगाबाद, प्रतिनिधी:

देश भरातील अमानवीय स्त्रीहिंसेस जबाबदार पितृसत्ताक ,जातीयवादी मानसिकतेचा जाहीर निषेध करत सत्यशोधक महिला आघाडी, स्रीअधिकार मंच, सत्यशोधक विद्यार्थी संघटनेच्या वतीने स्त्री अभ्यास विषय पदवी स्तरावर अनिवार्य करण्याबाबत दि 19ऑटोबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू मा. प्रमोद  येवले  यांना निवेदन देण्यात आले.

       संपूर्ण भारतामध्ये स्त्रियांवरील विविध प्रकारच्या हिंसेचा प्रश्न ऐरणीवर आला असून  स्त्री हिंसेच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. स्त्रियांवरील हिंसेचा हा प्रश्न केवळ कायद्याव्दारे शिक्षा देऊन सुटणार नाही. भारतीय समाजातील पुरुषी मानसिकता बदलण्यासाठी व स्त्री-पुरुष समानता आणण्यासाठी स्रीअभ्यास हा अभ्यासक्रम पदवी स्तरावर असणे आवश्यक आहे. हा अनिवार्य अभ्यासक्रम असल्यास सर्वच विद्यार्थ्यांमध्ये लिंगभाव संवेदनशीलता निर्माण होण्यास मदत होईल.

     शिक्षण हे प्रबोधनाचे सर्वोत्तम साधन आहे. समताधिष्ठित समाज निर्माण करण्याकरीत आज लिंगभाव समानतेची आवश्यकता निर्माण झालेली आहे .स्त्री अभ्यास या अभ्यासक्रमामध्ये सर्वच पातळीवर स्त्री-पुरुष समानता कशी येईल याबद्दलच प्रबोधन केले जाईल ,जाते .स्त्रियांवरील वाढत्या हिंसाचाराच्या पातळीवर हे प्रबोधन होणे आजच्या काळाची गरज आहे .स्त्री-पुरुष समतेचा विचार समाजात विकसित करण्याकरिता स्त्रियांचे समाजातील दुय्यम स्थान ,स्त्रियांकडे बघण्याचा पुरुषप्रधान दृष्टिकोन ,स्त्रियांवर होणार हिंसाचार ,झपाट्याने कमी होणार स्त्री-पुरुष लिंग गुणोत्तर ,बालविवाह, स्त्रीभ्रूणहत्या इत्यादी प्रश्नांच्या कारणमीमांसा  यावर विशेष भर या अभ्यासक्रमात दिला जातो.

      विद्यापीठ अनुदान आयोग ही शैक्षणिक संस्थांमध्ये लिंगभाव समानते करीत आग्रही असून त्यासाठी विविध उपाय योजना राबवित आहे. समताधिष्ठित समाज निर्माण करण्याकरिता आज लिंभाक समानतेची आवश्यकता निर्माण झालेली असल्याने डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठाणे पुढाकार घेऊन विद्यापीठातर्फे येणाऱ्या पदवी अभ्यासक्रमांना पर्यावरण या विषयाप्रमाणे स्रीअभ्यास हा विषय अनिवार्य करण्यात यावा अशा प्रकारचा उपक्रम राबविल्यास लिंगभाव  समानता अनिवार्य अभ्यासक्रम राबवणारे महाराष्ट्रातील नाहीतर देशातील पहिले विद्यापीठ ठरेल आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची स्रीदास्यअंताची लढाई बळकट होईल अशा आशयाचे निवेदन देण्यात आले ..

        निवेदन देतांना स्रीअधिकार मंचच्या मंजुश्री लांडगे ,सत्यशोधक महिला आघाडीच्या सोनाली मस्के ,सत्यशोधक विद्यार्थी संघटना महाराष्ट्र चे अमोल खरात व अनेक विद्यार्थी उपस्थित होते त्यामध्ये  ज्योती गांवडे, विकास डोंगरदिवे, प्रविण सरकटे, सय्यद मुबीन,भारती खोतकर

No comments:

Post a Comment

Pages