किनवट,दि.२० : एकरी २५ हजार विना पचंनामा, विना पहाणी सरसकट अतिवृष्टी मदत जाहिर करा,अशी मागणी अखिल भारतीय किसान सभेचे राज्य कार्याध्यक्ष काॅ.अर्जुन आडे यांनी केली आहे.
किसान सभेची बैठक इस्लापूर येथे नुकतीच संपन्न झाली.यावेळी ते बोलत होते.पुढे बोलताना ते म्हणाले की,गेल्या काही दिवासांपासून परतिच्या पाउसाने प्रचंड नुकसान केले आहे.शेती पिके उदध्वस्त झाले आहेत.हाता तोंडाला आलेले सोयाबीन कापूस ,मका इत्यादी पिके जाग्यावर कुजून कोंबे फुटली आहेत.
परिणामी शेतकरी आणि शेतीवर अवलबूंन असलेल्यांंच्या वतीने दि. २८ ला निर्णायक बेमुदत डपड ठोको-रास्ता रोकों आंदोलन इस्लापूर राज्यमहामार्गावर करण्यात येईल.
यावेळी जेष्ठ शेतकरी श्री. करेवाड ,श्री. व्यवहारे ,खंडेराव कानडे,स्टॅलिन आडे, तानाजी राठोड, राम कंडेल,इरफाम पठाण,जनार्दन काळे, राहुल राठोड, शिवाजी किरवले,आनंद लव्हाळे ,विशाल आडे ,मोहन जाधव, योगीराज जाधव,दिलीप जाधव यांच्यासह शेतकरी ,कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment