इस्लापुर दि.१८
कला ही शब्दापेक्षा चित्रातून अधिक व्यक्त होते,कला ही माणसाला जगायला शिकवते,प्रत्येक माणसात काहिना काही कला असते फक्त ती ओळखता आली पाहिजे तसेच त्यासाठी पुरेसा वेळ देणे गरजेचे आहे या करिता भारत जोडी युवा अकादमीचे अध्यक्ष डॉ.अशोक बेलखोडे व कला शिक्षक शिवराज बामणिकर यांच्या संकल्पनेतून साने गुरुजी चित्रकला महाविद्यालय किनवट व साने गुरुजी कला महाविद्यालय इस्लापुर यांच्या संयुक्त विद्यमाने प्रसिद्ध अशा सहस्रकुंड धबधबा येथे निसर्ग चित्रण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यशाळेसाठी किनवट, इस्लापुर,वसमत, माहूर,बाळापुर,नांदेड येथून 14 चित्रकार सहभागी झाले होते.या कार्यशाळेस, जेष्ठ चित्रकार श्री.रणजित वर्मा, सतिष वाळकिकर व सौ. सुरेखा आंबेकर यांची विशेष उपस्थिती व मार्गदर्शन लाभले तर दिलीप दारव्हेकर, वसंत गाडेकर, अमोल सालमोठे यांच्या सह अनेक चित्रकारांनी सहभाग घेतला. आभार प्रदर्शन अश्वनी उईके यांनी मांडले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी , डॉ.राहुल तौर, संतोष ताडुरकर, तुकाराम बोनगिर, प्रा. राजू धुळे,नितीन टापरे, महेरसिंग चव्हाण, दत्ताहरी पांचाळ यांचे विशेष योगदान लाभले.
No comments:
Post a Comment