64 व्या महापरिनिर्वाणदिनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना विविध ठिकाणी अभिवादन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 6 December 2020

64 व्या महापरिनिर्वाणदिनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना विविध ठिकाणी अभिवादनकिनवट/प्रतिनिधी दि.6 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त (ता.6) रविवारी रोजी सकाळी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ अभिवादन करण्यात आले.

    प्रारंभी भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष अभियंता प्रशांत ठमके, आमदार भीमराव केराम, नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, संदीप केंद्रे तालुका अध्यक्ष, माजी उपाध्यक्ष श्रीनिवास नेम्मानीवार, अनिल तिरमनवार, पोलीस निरीक्षक मारोती थोरात, सपोनि विजय कांबळे, रिपाइंचे मराठवाडा प्रदेश उपाध्यक्ष दादाराव कयापाक, माजी नगराध्यक्ष अरूण आळणे, प्रा.डॉ.अंबादास कांबळे, पीरिपचे जिल्हाध्यक्ष विनोद भरणे, विवेक ओंकार, अॅड.मिलिंद सर्पे, गोकुळ भवरे, प्रा.पंजाब शेरे, रमेश मुनेश्वर, मिलिंद धावारे, प्रकाश नगराळे, प्रा.रविकांत सर्पे, अॅड.सुनील येरेकार, मारोती मुनेश्वर, दशरथ पवार, सुरेश कावळे, उमाकांत कराळे, संतोष मरस्कोल्हे, सुरेश जाधव, दशरथ पवार, किशन परेकार, शंकर नगराळे, गौतम पाटील, पवन सर्पे, सम्यक सर्पे, रवी कांबळे, प्रशिक मुनेश्वर, शुभम भवरे, आकाश सर्पे, विशाल गिमेकार, आनंद कावळे, यांनी डॉ.आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.या प्रसंगी महेंद्र नरवाडे यांनी सामुहिक वंदना घेतली. उत्तम कानिंदे यांनी सूत्रसंचालन केले.

     यावेळी समाजबांधव, प्रतिष्ठित नागरीक, पत्रकार उपस्थित होते. अभिवादन दिनानिमित्त आयोजक अॅड.सम्राट सर्पे, निखिल कावळे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा पँथर किनवट शाखेच्या वतीने रक्तदान शिबीर घेण्यात आले. यावेळी 101 च्या वर रक्तदात्यांनी रक्तदान करून रक्तदानाचे तिसरे वर्ष यशस्वी केले. यावेळी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष दत्ता कोकाटे, ज्योतीबादादा खराटे, तालुकाप्रमुख बालाजी मुरकूटे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून रक्तदान शिबीरास भेट दिली. शिबीरास नांदेड येथील गुरूगोविंदसिंघजी ब्लड बँकेचे डॉ.कनकदंडे व राहूल वाघमारे यांनी सहकार्य केले.

No comments:

Post a Comment

Pages