डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ऑनलाईन अभिवादन करून बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद दिल्याबद्दल महापौर व आयुक्तांनी मानले अनुयायांचे आभार - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 7 December 2020

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ऑनलाईन अभिवादन करून बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद दिल्याबद्दल महापौर व आयुक्तांनी मानले अनुयायांचे आभार

 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ऑनलाईन अभिवादन करून बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद दिल्याबद्दल महापौर व  आयुक्तांनी मानले अनुयायांचे आभार मुंबई : डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनी यंदा कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दादर स्थित चैत्यभूमी येथे प्रत्यक्ष न येता ऑनलाईन अभिवादन करून लाखो भीम अनुयायांनी सर्वांसमोर एक अनोखे उदाहरण ठेवले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आवाहनाला संपूर्ण प्रतिसाद दिल्या बद्दल मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह मनपा आयुक्त इकबलसिंह चहल यांनी देशभरातील अनुयायांचे आभार मानले आहेत. 

              मुंबईत दादर येथे महामानव भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे चैत्यभूमी समर्क आहे दरवर्षी महापरिनिर्वाण दिनी (६डिसेंबर) रोजी लाखों च्या संख्येने अनुयायी अभिवादन करण्यास येत असतात कोरोना संसर्ग पसरू नये यासाठी खबरदारी म्हणून यंदा अनुयायांनी चैत्यभूमीवर न येता ऑनलाइन प्रक्षेपणातून अभिवादन करावे,असे आवाहन सातत्याने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या करण्यात आले होते. त्यास अनुयायांनी संपूर्ण प्रतिसाद दिला. 

        डॉ बाबासाहेब यांनी नेहमीच राष्ट्र समाजहिताचा विचार करून त्यास सर्वोच्च प्राथमिकता दिली.त्यांची ही विचारसरणी तंतोतंत पाळत एकजुटीने दाखवून दिले.


बृहन्मुंबई मनपाच्या फेसबुक ,युट्युब,ट्विटर खात्यांवरूनही  चैत्यभूमी येथील शासकीय मानवंदनेसह अभिवादनाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. यामुळे अनुयायांना आपापल्या घरी राहून चैत्यभूमी ला  अभिवादन करणे शक्य झाले.अनुयायांच्या सहकार्याबद्दल मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आयुक्त इकबलसिंह चहल यांनी आभार मानले आहेत.


  

No comments:

Post a Comment

Pages