महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ ब्रिजेश दीक्षित यांचा सायकलसह मेट्रो ट्रेनने प्रवास, इतर अधिकाऱ्यांना केले प्रेरित - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 8 December 2020

महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ ब्रिजेश दीक्षित यांचा सायकलसह मेट्रो ट्रेनने प्रवास, इतर अधिकाऱ्यांना केले प्रेरित


नागपुर:

 महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी सायकलने मेट्रो स्टेशनची पाहणी केली. शंकर नगर चौक तसेच रचना जंक्शन मेट्रो स्टेशनची नुकतीच सीएमआरएस तर्फे पाहणी करण्यात आली असून सदर मेट्रो स्टेशन लवकरच नागरीकांकरीता खुले होण्याच्या मार्गावर आहे याच अनुषंगाने महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी आज शंकर नगर मेट्रो स्टेशनची पाहणी केली व स्टेशन परिसरात करण्यात आलेल्या सोयी-सुविधांचा आढावा घेत, समाधान व्यक्त केले. या व्यतिरिक्त डॉ. दीक्षित यांनी सिताबर्डी इंटरचेंज (ऑरेंज आणि ऍक्वा लाईन मार्गिका), खापरी मेट्रो स्टेशन, मिहान डेपोची सायकलने प्रत्यक्ष पाहणी केली.     

यावेळी कार्यकारी संचालक (प्रशासन) श्री.अनिल कोकाटे, महाव्यवस्थापक श्री. सुधाकर उराडे तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.No comments:

Post a Comment

Pages