भिमा कोरेगांव हल्ला प्रकणातील आरोपींना शिक्षा द्या या मागणीसाठी राज्यव्यापी बाईक रॅली - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 16 January 2021

भिमा कोरेगांव हल्ला प्रकणातील आरोपींना शिक्षा द्या या मागणीसाठी राज्यव्यापी बाईक रॅली

पुणे :

भिमा कोरेगांव याठिकाणी विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी आलेल्या आंबेडकरी अनुयायावर हातामध्ये भगवे झेंडे घेवून हिंदूत्ववादी पक्ष संघटनेच्या समर्थकांकडून गंभीर हल्ला चढवून दंगल माजविण्यात आली होती. यामुळे जातीय तेड निर्माण करून जातीय दंगली घडविण्याचे कटकारस्थान करण्यात आले होते. यात विविध दाखल फिर्यादी मध्ये संभाजी भिडे व मिलींद एकबोटे यांची आरोपी नावे दाखल करण्यात आली असल्याने मिलींद एकबोटे यास अटक करण्यात आली होती त्यावेळी यातील त्याचा सहभाग लक्षात घेवून त्यांना पुन्हा याच अनुषंगाने दाखल दुसऱ्या गुन्हयात देखील अटक करण्यात आली होती. पोलीस फिर्यादी नुसार सुमारे १५०० आरोपींचा यामध्ये समावेश होता असे नमूद असताना देखील या प्रकरणी अद्यापपर्यंत केवळ १०० च्या आस पास लोकांनाच अटक करण्यात आली आहे. संभाजी भिडे याला वगळून केवळ ४० आरोपींन विरूध्द चार्जशिट दाखल करण्याचा प्रकार पुणे पोलिसांकडून सुरू असून त्यास गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मंजूरी दिली बाबतचा प्रकार निंदणीय आहे. 


यातील मुख्य संशयीत आरोपी म्हणून संभाजी भिडे याचा उल्लेख वारंवार करण्यात येत असून त्या नावे फिर्याद देखील दाखल करण्यात आलेली आहे. तपास अधिकारी यांनी संभाजी भिडे याची अटक व चौकशी गरजेची असल्याने त्या अनुषंगानेचा तपास करण्यासाठी आपली पथके संभाजी भिडे याचा शोध घेण्यासाठी सांगली याठिकाणी २२ मार्च २०१८ रोजी पाठविली होती. परंतु तत्काली मुख्यमंत्र्यांच्या दबावाखाली पुढे चौकशी होवू शकली नाही, व संभाजी भिडे यासह उर्वरित १४०० आरोपींना संरक्षित करण्याचे प्रयत्न झालेले आहेत. तसेच पुणे ग्रामीण पोलिस दलाच्या वतीने या गुन्हयामध्ये दाखल करावयाच्या चार्जशिट मधून संभाजी भिडे याचे नाव वगळले असल्याने याचा तिव्र निषेध करण्यात येत असून हा प्रकार आंबेडकरी जनतेचा विश्वासघात करणारी असून भिमा कोरेगाव पिडीताना न्याय नाकारणारी आहे. 


सध्या राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार असून यातील घटकपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाने सातत्याने संभाजी भिडे व इतर आरोपींच्या अटकेसाठी आग्रह धरलेला होता प्रसंगी आंदोलने देखील केली होती. संसदेपासून ते विधीमंडळापर्यंत त्यांचे लोकप्रतिनिधींनी आवाज उचलून संभाजी भिडेच्या अटकेची आग्रही मागणी केली होती. विदयमान मुख्यमंत्री मा.श्री.उध्दव ठाकरे यांचे संभाजी भिडे यांच्याशी व्यक्तीगत पातळीवर चांगले संबंध असले तरी संभाजी भिडे हा राज्यसरकारचा अपराधी असून त्याच्यावर कायदयान्वये कारवाई होणे आवश्यक असल्याने राजधर्माचे पालन करत संभाजी भिडेच्या अटकेचे आदेश दयावेत तसेच याप्रकरणी आंबेडकरी समुदायाला वेळेत न्याय मिळेल यासाठी आवश्यक ते पाऊले उचलावीत असे अवाहन करण्यात येत आहे.


दरम्यान सदर प्रकरणी महत्वाच्या नेत्यांच्या भेटी घेवून त्यांनी या संदर्भामध्ये अधिक स्पष्ट आग्रही भूमिका घेत या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथक (SIT) ची स्थापना करावी अशी विनंती करणार आहोत.


आज रोजी दाखल गुन्हयांमध्ये आरोपी अटक नसल्याने ३ वर्षानंतर देखील चार्जशिट देखील दाखल करण्यात आलेली नाही. त्यामुळे पिडीत दलित कुटूंबियांना न्यायाच्या प्रकियेपासून दूर राहावे लागत आहे. Delay Justice is Also Injustice या न्यायाप्रमाणे आंबेडकरी अनुयायावर घोर अन्याय होत आहे. असा अन्याय होवू नये यासाठी महाराष्ट्रातील व देशभरातील सहयोगी पक्ष संघटनांच्या वतीने सुमारे एक लाख सहयांचे निवेदन मा. मुख्य न्यायाधीश सर्वोच्च न्यायालय व मा. मुख्य न्यायाधीश मुंबई उच्च न्यायालय यांना सादर करण्यात येणार असून त्यांच्या सहयांची मोहिम आज रोजी पासून सुरू करण्यात येत आहे. तसेच ईमेल द्वारे सुमारे २५ हजार व्यक्तीगत निवेदने उपरोक्त न्यायाधीशांना पाठविण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment

Pages