नालंदा ज्ञान मंदिर वरळी येथील संस्थेच्या वतीने गरजू मुलींना लॅपटॉप चे वाटप ऑनलाइन च्या स्पर्धेत गरीब मुलींना सुध्दा संधी मिळावी ही अपेक्षा असे मत संस्थेचे अध्यक्ष अनंत कांबळे यांनी या प्रसंगी व्यक्त केले. - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 15 January 2021

नालंदा ज्ञान मंदिर वरळी येथील संस्थेच्या वतीने गरजू मुलींना लॅपटॉप चे वाटप ऑनलाइन च्या स्पर्धेत गरीब मुलींना सुध्दा संधी मिळावी ही अपेक्षा असे मत संस्थेचे अध्यक्ष अनंत कांबळे यांनी या प्रसंगी व्यक्त केले.


नालंदा ज्ञान मंदिर जिजामाता नगर वरळी यांच्या वतीने सन २०१६ पासून दोन गरीब मुलींना संस्थेच्या सावित्रीमाई फुले शैक्षणिक स्कॉलरशिप देण्याचे सुरवात केले. अनेक मुलींना दरवर्षी आर्थिक मदत करण्या पेक्षा फक्त दोन मुलींना १२ वी पर्यंत   शिक्षण घेण्यासाठी दरवर्षी आर्थिक आणि शैक्षणिक मदत संस्था करीत आहे. या योजेअंतर्गत कुमारी सोनाक्षी वाघमारे आणि श्रेया सावंत यांची निवड करण्यात आली होती. सोनाक्षी वाघमारे ही इयत्ता नववी या वर्गात सिद्धार्थ मल्टिपर्पज रेसिडेंशल हायस्कूल खारघर  या शाळेत शिकत आहे तर श्रेया सावंत ही सुध्दा नववी मध्ये शिकत असून ती कन्या हायस्कूल दादर  या शाळेची विद्यार्थीनी आहे. या दोन्ही मुली आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या दुर्बल घटकातून येतात. गेल्या एका वर्षात कोविड १९ च्या विळख्यात संपूर्ण जग सापडले आणि त्यामूळे अनेक मुलींचे शैक्षणिक नुकसान झाले. या काळात ऑनलाईन शिक्षण पद्धतीमुळे संस्थेने दत्तक घेतलेल्या मुलींना सुध्दा अनेक तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागले. याचाच विचार करून संस्थेचे खजिनदार बाबासाहेब कांबळे यांनी या दोन्ही मुलींना लॅपटॉप देण्याचा प्रस्ताव सादर केला आणि अध्यक्ष अनंत कांबळे यांनी तात्काळ दोन लॅपटॉप घेण्यास मान्यता दिली. त्या प्रमाणे प्रत्येकी २३ हजार किमतीचे लेनोवा V १४५  चे लॅपटॉप वाटप दिनांक १० जानेवारी २०२१ रोजी संस्थेच्या वरळी येतील कार्यालयात   करण्यात आले. संस्थेचे लेखापाल श्री  वसंत गोडबोले, अध्यक्ष अंनत कांबळे, प्रा. संदीप गमरे, अड. संजय कोल्हापुरे, आणि आरजू कागदी  यांच्या हस्ते लॅपटॉप देण्यात आले. वसंत गोडबोले यांनी या प्रसंगी आपले मत व्यक्त करताना सावित्रीच्या लेकीच्या हाती काळानुसार पाटी ऐवजी लॅपटॉप असणे आवश्यक आहे असे मत व्यक्त केले.  तसेच कार्यक्रमासाठी उपस्थितीत असलेले  डॉ अनघा कांबळे यांनी बदलत्या परिस्थितीनुसार लॅपटॉप हे उत्तम शैक्षणिक मदत ठरेल असे सांगितले. संस्थेचे सदस्य  डॉ भूषण आरेकर, प्रा किशोर मोरे आणि डॉ प्रतिभा कांबळे  यांच्या हस्ते  दोन्ही मुलींना रोख रक्कम रुपये १५ हजार शैक्षणिक कामासाठी देण्यात आले. वरील सर्व कार्यक्रमाचे व्यवस्थापन संस्थेच्या चिटणीस आसावरी कांबळे, विवेक संस्थेचे संचालिका उर्मिला गोर्गुर्ले, सिंधू माने, स्वाती कांबळे यांनी पार पाडले. या कार्यक्रमासाठी बाळकृष्ण पाचलकर,विजय नाग, धनाजी जाधव आणि दीपक कांबळे हे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages