मिलिंद-नागसेनवनाच्या भूमीवर जीवापाड प्रेम करणारे माधवराव हरिभाऊ बोरडे यांचे निधन. - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 3 January 2021

मिलिंद-नागसेनवनाच्या भूमीवर जीवापाड प्रेम करणारे माधवराव हरिभाऊ बोरडे यांचे निधन.

 औरंगाबाद, दि. २ संत कबीर शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माधवराव हरिभाऊ बोरडे (74, नंदनवन कॉलनी) यांचे शनिवारी (2 जानेवारी) वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. 

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळावर त्यांनी काम केलेले आहे. तत्कालीन मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेत त्यांनी दीर्घकाळ काम केले आहे. त्याशिवाय विद्यापीठाच्या  नामांतराचा ठराव घ्यावा ह्या साठी त्यांनी पुढाकार घेतला होता.

 मराठवाडा विकास आंदोलनातही त्यांचे योगदान होते. विद्यापीठात मागासवर्गीयांचा अनुशेष भरण्यात त्यांची महत्व पूर्ण भूमिका होती.  त्यांच्या निधनाने शिक्षण क्षेत्रात हळ-हळ व्यक्त होत आहे. सामाजिक कार्यकर्ते ॲड.धनंजय बोरडे, कर सल्लागार कमलेश बोरडे, राहुल बोरडे यांचे ते वडील होत.

No comments:

Post a Comment

Pages