पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जागा वाढवण्यासाठी नसोसवायफ उद्यापासून बेमुदत अमरण उपोषण करणार - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 22 January 2021

पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जागा वाढवण्यासाठी नसोसवायफ उद्यापासून बेमुदत अमरण उपोषण करणार

 

नांदेड : नॅशनल एससी एसटी ओबीसी स्टुडन्ट अँड युथ फ्रंट मागील अनेक दिवसापासून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड मधील संलग्नित महाविद्यालये व विद्यापीठ संकुलामध्ये पदवीत्तरअभ्यासक्रमाच्या जागा वाढवण्याची मागणी विद्यापीठाच्या कुलगुरू यांच्या कडे अनेक दिवसापासून करत आहे पण विद्यापीठ प्रशासन व कुलगुरू या मागणीकडे दुर्लक्ष करत असल्याने दिनांक २३जानेवारी पासून विद्यापीठाच्या गेटसमोर नसोसवायएफ बेमुदत आंदोलन करणार आहे .

शैक्षणिक वर्ष २०१९-२०कोव्हिड -१९च्या लॉकडाऊनमध्ये गेले आहे. पण या शैक्षणिक वर्षात मोठ्या प्रमाणात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे विद्यार्थी मोठ्या पदवीउत्तीर्ण झाले आहेत.दरवर्षीप्रमाणे उत्तीर्ण होणाऱ्या प्रमाणापेक्षा पदवी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दुपटीपेक्षा अधिक आहे. तसेच या प्रमाणापेक्षा पदवीत्तरअभ्यासक्रमाच्या जागा खूपच कमी आहेत. त्यामुळे अनेक विद्यार्थी हे उच्च शिक्षणापासून वंचित राहणार आहेत.स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ हे राज्यातील नांदेड,परभणी,हिंगोली ,लातूर या दुष्काळी व अविकसित जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या सोयीसाठी स्थापित केले होते.या चारही जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांची पहिलीच आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. त्यात कोव्हिड-१९च्या लोकडाऊनमध्ये हि परिस्थिती अधिक बिकट झाली आहे.अशा वेळी हे विद्यार्थी राज्यातील इतर विद्यापीठांमध्ये सुद्धा प्रवेशासाठी अर्ज करू शकत नाहीत आणि विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालय व संकुलामध्ये पदवीत्तरअभ्यासक्रमाच्या जागा या अतिशय अल्प असल्याने त्यांना प्रवेश मिळू शकत नाही. संघटनेच्या पदाधिकाऱ्याकडे विद्यार्थी व पालक हे जागा वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याची विनंती होत आहे या संदर्भात नसोसवायएफच्या शिष्टमंडळाने  विद्यापीठाच्या  कुलगुरू माननीय डॉ.उद्धव भोसले यांच्याकडे शिष्टमंडळाद्वारे चर्चा केली पण कुलगुरू डॉ. उद्धव भोसले हे या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहेत. तसेच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मा.कुलगुरु ना मा.उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांच्या सोबत संवाद करून  विद्यापीठातील विद्यार्थ्यांची परिस्थिती अवगत करून  देण्या संदर्भात विंनती केली होती .पण माननीय कुलगुरूंनी या सूचने कडे हि  दुर्लक्ष केले आहे.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा केंद्रबिंदू हा विद्यार्थी आहे.पण हाच विद्यार्थी आज उच्य शिक्षणापासून वंचित राहत आहे. जागा वाढवण्याच्या संदर्भातील निर्णयातून विद्यापीठाचे व राज्य सरकारचे कुठलेही आर्थिक नुकसान होणार नाही .उलट विद्यापीठाला यातून आर्थिक मदतच होईल.तसेच विद्यापीठाचा उद्देश सफल होईल .पण या सगळ्या बाबीकडे   कुलगुरू डॉ.उद्धव भोसले नियमावर बोट ठेऊन  दुर्लक्ष करत आहेत. पण ऐरवी महाराष्ट्रात विद्यापीठ कायद्याचे नियम  धाब्यावर ठेवून निर्णय घेतले आहेत.हे विसरता कामा नये, या आधी नियमांचे उल्लंघन करून माननीय कुलगुरुनी पदवीत्तर अभ्यासक्रमाच्या जागा वाढवल्या  होत्या.मागील दोन वर्षापासून २०टक्के पेक्षा अधिक जागा कुठलेही विद्यार्थी संघटनेची मागणी नसताना कुलगुरूंनी वाढवली आहे. मग याच शैक्षणिक वर्षात या नियमावर बोट ठेवून विद्यार्थ्यांना शिक्षणापासून का वंचित ठेवले जात आहे असा सवाल संघटनेचा कुलगुरूंना आहे.दिनांक २३ तारखेपासून विद्यापीठ गेट समोर सुरू होणाऱ्या आमरण उपोषणाचे नेतृत्व संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.डी. हर्षवर्धन हे स्वतः  करणार आहेत.जोपर्यंत जागा वाढणार नाहीत  तोपर्यंत हे आमरण उपोषण सुरूच राहील. या शैक्षणिक वर्षात मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना  न्याय देण्यासाठी नसोसवायफ सक्रिय आहे .तसेच संघटनेकडून  प्रवेशापासून वंचित असलेल्या विद्यार्थी व  पालकांना  आवाहन करण्यात येते की ,मोठ्या संख्येने या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी २३जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा  विद्यापीठाच्या गेटसमोर उपस्थित रहावे अशी माहिती संघटनेचे राज्य प्रवक्ते प्रा.सतीश वागरे व जिल्हा प्रवक्ता संशोधक विद्यार्थी मनोहर सोनकांबळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे.

No comments:

Post a Comment

Pages