हिमायनागर शहराच्या वार्ड क्रमांक 7 मध्ये भिषण पाणी टंचाई ; नगर पंचायत चे दुर्लक्ष - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 14 January 2021

हिमायनागर शहराच्या वार्ड क्रमांक 7 मध्ये भिषण पाणी टंचाई ; नगर पंचायत चे दुर्लक्ष

        

हिमायतनगर  : शहरामध्ये आंबेडकर नगर परिसरात वार्ड क्रमांक 7 मध्ये 10 दिवसापासून भिषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे.

याचे कारण असे की,1063 लोकसंख्येचा वार्डा मध्ये तिन बोअर मारण्यात आले होते.

त्या पैकी बौद्ध विहार जवळील बोअर डगरून गेला होता, बाकी दोन बोअरावर ह्या वार्डातील नागरिक पाणी भरत होते. त्यातील जनता कॉलनी शाळा जवळील बोअर व, अण्णाभाऊ साठे नगर गल्लीतील बोअर नादुरुस्त झाले असल्यामुळे संपूर्ण वार्ड क्रमांक 7 मध्ये गेल्या 10 दिवसापासून भिषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे.


वार्डातील महिला व,लहान मुलांना डोक्यावर भांडे ठेवून दुरून पाणी आणावे लागत असल्याने दिनांक 14/01/2021 रोजी वंचित बहुजन आघाडी चे कार्यकर्ते विशाल हनवते, स्वप्नील हनवते, प्रमोद हनवते,  व त्यांचे सोबत इतर कार्यकर्त्यांनी निवेदन देऊन येत्या दोन दिवसात बोअर चालू करून नाही दिल्यास हिमायतनगर नगर  पंचायतीवर घागर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.

No comments:

Post a Comment

Pages