आंबेडकरी कार्यकर्त्यांवरील दाखल गुन्हे काढून घेणे व इतर मागण्यासाठी विद्यापीठात आंबेडकरवादी अत्याचाराविरोधी समितीचे जोरदार आंदोलन निवेदनातील मागण्यांवर कारवाई करण्याचे लेखी प्र. कुलगुरू डॉ.शाम शिरसाठ यांचे आश्वासन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 22 February 2021

आंबेडकरी कार्यकर्त्यांवरील दाखल गुन्हे काढून घेणे व इतर मागण्यासाठी विद्यापीठात आंबेडकरवादी अत्याचाराविरोधी समितीचे जोरदार आंदोलन निवेदनातील मागण्यांवर कारवाई करण्याचे लेखी प्र. कुलगुरू डॉ.शाम शिरसाठ यांचे आश्वासन

भारतीय राज्यघटनेनुसार एखाद्या न्याय्य प्रश्नांबाबत पाठपुरावा करणे व प्रसंगी लोकशाही मार्गाचा अवलंब करण्याचा अधिकार नागरिकांना बहाल करण्यात आला आहे परंतु मागील काही प्रसंगी विद्यापीठातील अनेक उच्चपदस्थ अधिकारी आपल्या पद व अधिकाराचा गैर वापर करून पोलीस प्रशासनास चुकीची माहिती देऊन आंदोलकांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करत असल्यानेह्यात प्रामुख्याने आंबेडकरी पक्ष संघटनेच्या कार्यकर्त्यांना जाणीवपूर्वक लक्ष करण्यात येत असल्याने आज आंबेडकरवादी अत्याचाराविरोधी कृती समितीच्या वतीने विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारती समोर दुपारी.12 वाजता जोरदार आंदोलन करण्यात आले

विद्यापीठाची कृती ही लोकशाही मूल्यांचे अवमूल्यन करणारी असल्याचा आरोप करण्यात आला.

   आंबेडकरी कार्यकर्ते नागराज गायकवाड यांनी विद्यापीठाच्या विद्यमान कुलसचिव डॉ.जयश्री सूर्यवंशी यांच्या मूळ नियुक्ती बाबत आक्षेप नोंदवून निष्पक्षपणे चौकशी करण्याची व चौकशी पूर्ण होऊ पर्यंत त्यांना पदावरून हटविण्याची मागणी केली होती ह्या बाबत त्यांनी अनेकदा निवेदन देऊन व प्रशासनाशी चर्चा करून लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे परंतु मूळ प्रकरणाची सखोल चौकशी न करता केवळ आपल्याबाबत केलेल्या तक्रारी मुळे द्वेष भावनेतून आपल्या अधिकार व पदाचा गैरवापर करून कुलसचिव डॉ.जयश्री सूर्यवंशी यांनी नागराज गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी दि.25 जानेवारी रोजी केलेल्या आंदोलनाचा राग मनात ठेवून विद्यापीठाच्या पूर्णवेळ सेवेत नसलेले सुरक्षा अधिकारी सुरेश परदेशी यांच्या मार्फत गुन्हा दाखल करणे बाबत अर्ज दिला त्यात मा.पोलीस निरीक्षक,बेगमपुरा पोलीस ठाणे यांनी चौकशी करून सदरील तक्रारीच्या अनुषंगाने IPC 143,मपोअ-135 अन्वये गुन्हा नोंदविला परंतु नागराज गायकवाड व साहकऱ्यांवरील द्वेषापोटी डॉ.सूर्यवंशी यांनी सुरक्षा अधीकारी सुरेश परदेशी यांना पुन्हा पुरवणी जवाब देऊन 353 सारखा गंभीर गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले आहे.(ह्याचे संभाषण असलेली ध्वनीफित सगळीकडे व्हायरल ही झाली आहे)

सदरचा प्रकार हा अत्यंत गंभीर असून पद व अधिकाराचा गैरवापर करून आंबेडकरवादी कार्यकर्त्यांना खोट्या गुन्ह्यात गोवून त्यांचे मानसिक खच्चीकरण करण्याच्या ह्या प्रकाराचा धिक्कार करण्यात आला.

मागील अनेक वर्षांपासून विविध आंबेडकरी पक्ष संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या मागण्या अद्यापही प्रलंबित असून त्या तातडीने सोडविण्यात याव्या ह्या करिता प्र. कुलगुरू डॉ शाम शिरसाठ ह्यांना निवेदन सादर करण्यात आले.

त्यात खालील मागण्यांचा समावेश होता

1) नागराज गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात दाखल खोटा गुन्हा काढून घेण्यात यावा

2)कुलसचिव डॉ.जयश्री सूर्यवंशी यांच्या बाबतच्या तक्रारीची चौकशी पूर्ण होऊपर्यंत त्यांना कुलसचिव पदावरून हटविण्यात यावे.

3)आरक्षण डावलून कंत्राटी तत्वावर शिक्षक संवर्गातील भरलेल्या जागा तात्काळ रद्द कराव्यात

4)राजकीय दबावापोटी थांबविण्यात आलेला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्त 125 भीमगीतांचा 'गीत भिमायन' हा प्रकल्प तात्काळ पूर्ण करावा

5)खोट्या अनुभव प्रमानपत्राबाबत तक्रारी असलेल्या अधिकाऱ्यावर कारवाई करावी.

6)पेट-1 परीक्षेतील कथित गैरप्रकाराची चौकशी करून तात्काळ गुन्हा दाखल करावा व निगेटिव्ह मार्किंग पद्धत रद्द करावी व 30 डिसेंबर 2020 च्या परिपत्रकानुसार पेट-2 परीक्षा ऑनलाईन घेण्यात यावी.

7)विद्यापीठातील वसतिगृह तात्काळ सुरू करावे.

8)विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील 'ट्रेनिंग स्कुल फॉर इंटरन्स टु पॉलिटिक्स' हा विभाग तात्काळ सुरू करावा

9)वर्षानुवर्षे एकाच जागी ठाण मांडून बसलेल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांची बदली करण्यात यावी.

10)विद्यापीठातील सर्व विभागात व वसतिगृहातील पिण्याच्या पाण्याची समस्या तात्काळ सोडवावी

11)आरक्षित जागा भरण्यास दिरंगाई करणाऱ्या महाविद्यालयाचे संलग्निकरण रद्द करण्यात यावी.

12)विद्यापीठातील कुशल अकुशल कर्मचाऱ्यांना विद्यापीठाच्या सेवेत सामावून घ्यावे

13) महाकवी वामनदादा कर्डक यांना डी-लिट पदवीने सन्मानित करण्यात यावे

14)आरक्षण व नियुक्त्याबाबतचे सर्व नियम डावलून केलेल्या शिक्षक संवर्गातील 24 नियुक्त्या तात्काळ रद्द करण्यासाठी शासनाला कळविण्यात यावे आदी मागण्या करण्यात आल्या.


ह्यावेळी दिनकर ओंकार,डॉ.शंकर अंभोरे,डॉ. संदीप जाधव,सचिन निकम,डॉ.देवानंद वानखेडे,प्रकाश इंगळे,डॉ.कुणाल खरात,गुणरत्न सोनवणे,नितीन वाकेकर,ऍड.अतुल कांबळे,गौतम अमराव,लक्ष्मण हिवराळे,किशोर थोरात,संजय ठोकळ,ऍड.शिरीष कांबळे,लोकेश कांबळे,अमोल खरात,प्रा.सिद्धोधन मोरे,राहुल वडमारे,डॉ.अरुण शिरसाठ,डॉ.किशोर वाघ,डॉ.धनंजय रायबोले,अमोल दांडगे,जयश्री शिरके,विजय वाहुळ,राकेश पंडित,मनोज शेजवळ,गणेश साळवे,मनीष नरवडे,अमोल घुगे,गुरू कांबळे,महेंद्र तांबे,निशिकांत कांबळे,डॉ.राहुल तायडे,डॉ.धम्मा वाघ,राजेश नरवडे,वैभव सरदार,शुभम खापरे, मुकेश गायकवाड,विशाल मोरे,विजय शिंदे,पँथर सुनील शिंदे,राहुल खंडागळे,राकेश कांबळे,आनंद बोर्डे,नागेश जावळे, सूचित सोनवणे,डॉ.सचिन बोर्डे,अविनाश जगधने,नागसेन वानखेडे,सलीम पटेल,योगेश सोनवणे, संदीप वाहुळ,शैलेश चाबुकस्वार,अमोल होर्शील,आशुतोष नरवडे, दिलीप तडवी,मुकेश गायकवाड,अनिल दिपके,रवींद्र गवई,रामेश्वर काबाडे पाटील,सिध्दार्थ कांबळे,अविनाश सावंत,राहुल पंडित,दीपक जोगदंड,अनिल जाधव,नालंदा वाकोडे,ऋषी कांबळे,गोलू गवई,अश्विन मेश्राम,विश्वजित काळे,बलराज दाभाडे,बाळू भाऊ वाघमारे,सुहास वाहुळ,कचरू गवळी,सुमित काळे,अमोल भालेराव,मझर पठाण,अब्दुल रहमान आलम खान,नवाज कुरेशी,समी अली खान,शेहरोज शेख,लखन खंडागळे,शेहबाज शेख,परवेज खान,रोहित धनराज,भूषण चोपडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment

Pages