किनवट न्यायालय अभिवक्ता संघाच्या अध्यक्षपदी ॲड.अरविंद चव्हाण यांची निवड - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 3 February 2021

किनवट न्यायालय अभिवक्ता संघाच्या अध्यक्षपदी ॲड.अरविंद चव्हाण यांची निवड

 


किनवट, ता. ३( बातमीदार): किनवट न्यायालय अभीवक्ता संघाच्या अध्यक्षपदी ॲड.अरविंद चव्हाण यांची, तर सचिवपदी ॲड. पंकज गावंडे यांची आज (ता.३)निवड करण्यात आली.अध्यक्षपदासाठी ॲड. अरविंद चव्हाण व ॲड. किशोर मुनेश्वर यांच्यात निवडणूक झाली होती. अन्य पदाधिकारी हे बिनविरोध निवडून आले.

 निवडण्यात आलेले अभीवक्ता संघाचे  पदाधिकारी असे; अध्यक्ष ॲड.  अरविंद चव्हाण, सचिव ऍड. पंकज गावंडे उपाध्यक्ष ॲड.तोफिक कुरेशी, सहसचिव ॲड. बिपीन पवार, कोषाध्यक्ष ॲड. सुनील येरेकार. दोन कार्यकारिणी सदस्यांची लवकरच निवड करण्यात येईल.

 निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ॲड. विजय चाडावार यांनी काम पाहिले, तर त्यांना ॲड. सूनील  येरेकार यांनी सहकार्य केले. निवडणूक प्रक्रियेसाठी विठ्ठल आरपेलिवार व संतोष जकुलवाड  यांनी सहकार्य केले.

   निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडावी यासाठी ॲड. अनंत वैद्य, ॲड. सुभाष ताजने, ॲड. यशवंत गजभारे, ॲड. दिनानाथ दराडे, ॲड. राहुल सोनकांबळे आदिंनी पुढाकार घेतला होता.


No comments:

Post a Comment

Pages