राष्ट्रीय स्मारक महाड येथे चवदार तळे सत्याग्रह दिन साजरा. बार्टीच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन.. - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 20 March 2021

राष्ट्रीय स्मारक महाड येथे चवदार तळे सत्याग्रह दिन साजरा. बार्टीच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन..

 


    महाड :-  दिनांक २० मार्च २०२१ ( प्रतिनिधी )                                                                                                                            डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी ,पुणे अंतर्गत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक,महाड येथे शनिवार दिनांक २० मार्च २०२१ रोजी  " ९४ वा महाड चवदार तळे सत्याग्रह वर्धापण दिन सोहळा"  दिनानिमित्त    डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास  मा. धम्मज्योती गजभिये,  महासंचालक बार्टी पुणे , यांच्या हस्ते  पुष्पहार अर्पण करुन  महामानवास विनम्र अभिवादन करण्यात आले. तसेच छत्रपती संभाजी  महाराज यांच्या  पुतळ्यास पुष्पहार अर्पण  करुन चवदार तळे येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. त्यानंतर क्रांतीस्तंभ येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास मा.महासंचालक यांनी  अभिवादन केले.यावेळी   मा.राहुल पाटिल, वरिष्ट विभागीय वित्त प्रबंधक(मध्य रेल,पुणे) मा.जिवन पाटिल, मुख्याधिकारी नगरपालिका महाड, मा.निलेश तांबे , उपविभागीय पोलिस अधिकारी महाड, आदी उपस्थित होते.मा. धम्मज्योती गजभिये, महासंचालक बार्टी पुणे यांनी राष्ट्रीय स्मारक महाड येथील सभागृहात पत्रकार परिषद घेतली . यावेळी बार्टीच्या वतिने राबविण्यात येणा-या विविध योजना व उपक्रमाची माहिती  मा महासंचालक यांनी पत्रकार परिषदेत दिली. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातु रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी  बार्टी अंतर्गत राष्ट्रीय स्मारकास  भेट दिली. व मा. धम्मज्योती गजभिये यांच्यासोबत चर्चा केली. यावेळी

 राष्ट्रीय स्मारक महाड प्र.व्यवस्थापक प्रकाश जमधाडे,जनसंपर्क अधिकारी लिना कांबळे,प्रकल्प अधिकारी मिंलीद इंगोले,संशोधन सह्ययक शितल वानखडे तसेच  अधिकारीकर्मचारी  उपस्थितीत होते.    डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे  मुख्यालयात    महाड चवदार तळे सत्याग्रह दिनानिमित्त काॅन्फरन्स हाॅल येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मा. उमेश घुले, निबंधक बार्टी पुणे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी  मा.अंकुश खेतमाळी , उपायुक्त लेखा विभाग समाज कल्याण, श्रीमती रंजनी  वाघमारे, प्रकल्प अधिकारी व कर्मचाऱी उपस्थित होते..

No comments:

Post a Comment

Pages