संजय बामनिकर यांचे निधन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 21 March 2021

संजय बामनिकर यांचे निधन

किनवट , ता.२१: महाराष्ट्रातील प्रसिद्ध मराठी कवि, गझलकार, चित्रकार  संजय बामणीकर(वय ५३), नांदेड या़चे आज(ता.२१) निधन झाले आहे.ते महाराष्ट्रात एक प्रसिद्ध कवि, गझलकार, चित्रकार, समिक्षक  म्हणून प्रसिद्ध होते.

    संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्या गझलेचा,चित्रकलेचा विशिष्ट चाहता वर्ग होता.ते फाईन आर्ट मध्ये स्नातक होते.ते "उद्याचा मराठवाडा" व इतर वर्तमानपत्रातून महाराष्ट्रातील उत्कृष्ट गझलकारांच्या गझलांचा परिचय करुन देणारे समिक्षणात्मक लेख लिहायचे.चित्रकला व गझल लेखणा संदर्भात त्यांचे लेख विविध वर्तमानपत्रे, नियतकालिकां मधून प्रकाशित होत असायचे.त्यांचा एक कविता संग्रह “आता बस झाले” हा प्रकाशीत झालेला होता. ते अविवाहीत ब्रम्हचारी होते.एक हळव्या मनाचा कवि, चित्रकार मित्र काळाने हिरावून नेल्या मुळे त्यांचा संपूर्ण चाहता वर्ग,मित्र परिवार द:ख सागरात बुडालेला आहे.राहसाल तूम्ही आम्हाला तुमच्या गझलेतून वारंवार, तुमच्या स्मृतिंना सलाम,मानाचा मुजरा, भावपूर्ण श्रद्धांजली.”

No comments:

Post a Comment

Pages