नांदेड :
माजी सामाजिक न्याय मंत्री तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष भिमशक्तीचे संस्थापक अध्यक्ष मा.आयु चंद्रकांतजी हांडोरे साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त भिमशक्ती नांदेड शहर जिल्ह्याच्या वतीने कोरोना चा प्रादुर्भाव लक्षात घेऊन ऋषी पठण बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अंतर्गत श्रामनेर प्रशिक्षण केंद्र खुरगाव, नांदुसा ,तालुका जिल्हा नांदेड भोजनदान देण्यात आले तसेच वृक्षरोपण यावेळी करण्यात आले. उपस्थित प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख भदन्त पयाबोधी थेरो, भिमशक्ती नांदेड जिल्हा युवा अध्यक्ष तथा नगरसेवक प्रति. सुरेश हाटकर, भीमशक्ती शहर जिल्हाध्यक्ष संजयभाऊ कवठेकर,ऑटो संघटनेचे सुनीलभाऊ खिल्लारे, युवा नेते चेतन भुजबळ ,शहर सरचिटणीस विठ्ठल कदम, शहर उपाध्यक्ष मिलिन लोकरे, ज्येष्ठ कार्यकर्ते भगवान काका गायकवाड,सुनिल आटकोरे सर,भया शिदे,आदी कार्यकर्ते उपस्थित होते..
No comments:
Post a Comment