विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी स्पर्धा परिक्षा अभ्यासिका सुरु ठेवण्यास मुभा - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 12 March 2021

विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी स्पर्धा परिक्षा अभ्यासिका सुरु ठेवण्यास मुभा


नांदेड , 12 :- जिल्ह्यातील व महानगरपालिका कार्यक्षेत्रातील विद्यार्थ्यांना केंद्रीय लोकसेवा आयोग व राज्य लोकसेवा आयोग यासह इतर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी चालू असलेल्या अभ्यासिका यांना 10 मार्च रोजी निर्गमीत केलेल्या आदेशातून सूट देण्यात आली आहे. त्यामुळे 12 ते 21 मार्च 2021 या कालावधीत या सर्व अभ्यासिका कोरोना प्रतिबंध सर्व उपाययोजनांचे पालन करुन पूर्णवेळ चालू राहतील याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.  


No comments:

Post a Comment

Pages