वन हक्क दाव्यांच्या अपिलांवर निर्णय घेण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत... समितित नीळकंठ कातले यांच्या सह डुडुळे,जेवलेवाड यांची वर्णी... - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 12 March 2021

वन हक्क दाव्यांच्या अपिलांवर निर्णय घेण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत... समितित नीळकंठ कातले यांच्या सह डुडुळे,जेवलेवाड यांची वर्णी...

किनवट प्रतिनिधी: 

अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी वन हक्काची मान्यता अधिनियम अंतर्गत जिल्हा स्तरीय वनहक्क समितीने नामंजूर केलेल्या अनुसूचित क्षेत्रातील वनहक्क दाव्यांच्या अपिलावर निर्णय घेण्यासाठी विभागीय आयुक्त औरंगाबाद यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय वन हक्क समितीची स्थापना करण्यात आली असून या समितीची बैठक विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 22 मार्च रोजी विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद येथे पार पडणार आहे.


माहूर किनवट तालुक्यात सह मराठवाड्यातील अनुसूचित जमाती व पारंपारिक वननिवासी वनहक्काचे मान्यता अधिनियमांतर्गत जिल्हास्तरीय वनहक्क समिती कडे सादर केलेले प्रस्ताव काही कारणास्तव नामंजूर करण्यात आले होते.या बाबीची गंभीर दखल घेत किनवट विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्यतत्पर आमदार भीमराव केराम यांनी वन हक्क पट्ट्याचा लक्षवेधी मुद्दा प्रशासनाकडे लावून धरला होता.यासाठी सातत्याने मंत्रालयीन स्तरावर पत्रव्यवहार तर जिल्‍हाधिकारी पासून सचिवांपर्यंत विशेषता माहूर आणि किनवट तालुक्यातील वन हक्क पट्ट्या संदर्भातील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला कास्त करत असलेल्या शेतकऱ्यांचा प्रश्न निवेदन पत्राद्वारे मांडला होता.आमदार केराम यांच्या पाठपुराव्याची दखल घेत प्रशासनाने जिल्हास्तरीय वन हक्क समितीने नामंजूर केलेल्या अनुसूचित क्षेत्रातील वन हक्क दाव्यांच्या अपिलावर निर्णय घेण्यासाठी विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय वन हक्क समितीची स्थापना करण्यात आली आहे.या समितीत सदस्य म्हणून आमदार भीमराव केराम यांचे स्वीय सहाय्यक व निकटवर्तीय पंचायत समिती सदस्य निळकंठ कातले,सरपंच ज्ञानेश्वर जेवलेवाड,माजी जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती जनाबाई डुडुळे यांच्या सह सदस्य म्हणून मुख्य वन संरक्षक आणि सदस्य सचिव म्हणून प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी किनवट यांची निवड करण्यात आली आहे.समितीची स्थापना झाल्यानंतर अनुसूचित क्षेत्रातील वन हक्क दाव्यांच्या अपिलावर निर्णय घेण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 22 मार्च रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले असून या बैठकीत प्रलंबित व नामंजूर करण्यात आलेल्या वन हक्क दाव्यावर निश्चितच योग्य तो निर्णय घेऊन ते मंजूर केला जाईल अशी अपेक्षा वनहक्क पट्ट्याचे पात्र लाभार्थ्यांकडून केली जात आहे.आमदार भीमराव केराम यांच्या दूरदृष्टी प्रयत्नातून वनहक्क दाव्या संदर्भात प्रशासनाच्या हालचालींना वेग आला आहे.शिवाय आमदार भीमराव केराम यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सदस्य प्रशासनापुढे शेतकऱ्यांची बाजू लावून धरतील व सर्वच दावे निकाली काढतील असा आशावाद लाभार्थी शेतकरी करत व्यक्त आहेत.

No comments:

Post a Comment

Pages