भीमजयंती शासन निर्देशानुसारच साजरी होणार भीमजयंती शांतता समितीच्या बैठकीत एकमुखी निर्णय - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 8 April 2021

भीमजयंती शासन निर्देशानुसारच साजरी होणार भीमजयंती शांतता समितीच्या बैठकीत एकमुखी निर्णय

औरंगाबाद :

विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या 130 व्या जयंती निमित्त दि.०७ एप्रिल रोजी सायं.६ वा. पैठणगेट येथील पोलीस उपायुक्त परिमंडळ-1 कार्यालयात पोलीस प्रशासन व आंबेडकरी अनुयायांची संयुक्त बैठक पोलीस उपायुक्त निकेश खाटमोडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली तर सहा.पोलीस आयुक्त श्री.भापकर,पोलीस निरीक्षक सचिन सानप,माजी उपमहापौर प्रकाश निकाळजे, दिनकर ओंकार,श्रावण गायकवाड,गौतम खरात,मुकुंद सोनवणे,दौलतराव मोरे ह्यांची प्रमुख उपस्थिती होती.


 बैठकीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भीमजयंती चा सोहळा हा शासन निर्देशानुसार साजरा करावा गर्दी टाळून घरातूनच कौटुंबीक जयंती साजरी करावी ह्या वर आंबेडकरी अनुयायांनी सहमती दर्शवत सर्व आंबेडकरी अनुयायी व नागरिकांच्या हितार्थ सुरक्षा,संयम, सहकार्य,कर्तव्य ह्या चतु:सूत्री नुसारच भीमजयंती करू असा निर्धारही आंबेडकरी अनुयायांनी व्यक्त केला.

भीमजयंती म्हणजे केवळ जल्लोष हा गैरसमज करण्यात येतो वास्तविक मागील अनेक वर्षांपासून समाजहिताच्या उपक्रमानी,प्रबोधनात्मक कार्यक्रमांनी भीमजयंती साजरी करण्याची परंपरा आंबेडकरी समूहाने जपली असून यंदाही कोरोनाच्या परिस्थितीला3 धीराने तोंड देण्याकरिता शासनाच्या निर्देशाचे काटेकोर पालन करत लोकोपयोगी उपक्रमांची सांगड घालत भीमजयंती करू कुठल्याही प्रकारे कोरोनाचा संसर्ग होणार नाही असे उपक्रम राबविण्यावर आमचा भर असेल असा एकमताचा निर्णय जाहीर करण्यात आला.


ह्यावेळी पारंपारिक मिरवणुकी न करता शैक्षणिक उपक्रम, रक्तदान शिबिरे, कोरोना व लसीकरणाची जनजागृती करणे,मास्क वाटप,निर्जंतुकिकर्णाची मोहीम राबवणे,गरजू नागरिकांना मदत करणे,ऑनलाईन उपक्रमातून विचारांची जयंती करणे असे उपक्रम राबविणार असल्याचे विविध जयंती मंडळाच्या प्रतिनिधींनी बैठकीत दिली.


तर शासनाने काही वेळ निर्देश शिथिल करून जयंती च्या सजावटीचे साहित्य,फुल-हार खरेदी साठी वेळ द्यावा,भडकल गेट येथे नियम व अटी आधारे अभिवादन करण्याची परवानगी द्यावी,गर्दी टाळण्यासाठी भडकलगेट ते टाऊन हॉल व मिलकोर्नर पर्यंत 1 मीटर चे अंतर राखून मार्किंग करावी,शासनाने जर परवानगी दिली नाही अथवा निर्बंध कडक केल्यास नागरिकांच्या वतीने जिल्हाधिकारी,पोलीस आयुक्त,पोलीस अधीक्षक,मनपा प्रशासक यांनी अभिवादन करावे,भडकल गेट व शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्याची स्वच्छता करण्यात यावी,शहरातील डॉ.बाबासाहेबांच्या सजावट, स्वच्छता, रंगरंगोटी, विद्युत रोषणाई करण्यात यावी नागरिकांना त्या कामी परवानगी द्यावी,फुल हार विक्री करण्याची परवानगी द्यावीरक्तदान शिबिर व लोकोपयोगी उपक्रमाचे स्वरूप पाहून नियम व अटी आधारे परवानगी द्यावी अश्या सूचना व विनंत्या आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी केल्या.

यावेळी पोलीस उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील

यांनीही उपस्थितांशी संवाद साधत लोकोपयोगी उपक्रम ज्यातून कुठल्याही प्रकारे कोरोनाचा संसर्ग होणार नाही त्यांना गर्दी टाळण्याच्या अटीवर परवानगी देऊ,प्रशासन सर्वतोपरी सहकार्य करेल,आपण मिळुन वैचारिक जयंती साजरीकरू,लसीकरण,मास्क,सनेटायजेशन,फिजिकल डिस्टनसिंग चे पालन ह्या बाबत पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन केले.


तर नागराज गायकवाड,संदीप शिरसाठ,डॉ.जमील देशमुख,योगेश बन,अरुण बोर्डे,सचिन निकम,गुणरत्न सोनवणे,विजय वाहुळ,मुकुल निकाळजे,आनंद कस्तूरे,शैलेंद्र मिसाळ,श्रीरंग ससाणे,सिद्धाधन मोरे,बाळूभाऊ वाघमारे,सोनू नरवडे,कपिल बनकर,पंकज बनसोडे,प्रथम कांबळे,राहुल मकासरे,राहुल खंडागळे,जयश्री शिर्के,सचिन शिंगाडे,प्रेम सोनवणे तसेच पोलीस कर्मचारी आदींची उपस्थिती होती


No comments:

Post a Comment

Pages