रेमीडीसीवरचा काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी. - स्वप्निल इंगळे पाटील - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 9 April 2021

रेमीडीसीवरचा काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी. - स्वप्निल इंगळे पाटील


नांदेड : रेमीडीसीवरचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य स्वप्नील इंगळे पाटील यांनी महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड चे पालकमंत्री ,  नांदेड चे जिल्हाधिकारी तथा अन्न व औषध प्रशासन विभागाचे विभागीय आयुक्त यांना देण्यात आले.

         कोरोना बाधित रुग्णांना बरे करण्यासाठी डॉक्टरांकडून रेमीडीसीवरच्या  इंजेक्शनची मात्रा दिली जाते. मात्र सध्या नांदेड जिल्ह्यात वाढती रुग्ण संख्या आणि रेमीडीसीवरची  मागणी पाहता कृत्रिम तुटवडा निर्माण झाल्यासारखी स्थिती असून एका इंजेक्शन मागे तीन ते पाच हजार रुपये आधी ची किंमत आकारून रुग्णांच्या नातेवाईकांची लूट केली जात असल्याचे चित्र नांदेडमध्ये निर्माण झाले आहे.

           राज्य शासनाच्या वतीने विक्री दर नक्की करण्यात आला आहे. मात्र बाजारपेठेत इंजेक्शन उपलब्ध नसल्याचे कारण सांगत त्याचा काळाबाजार होत असून दाम दुप्पट किंमतीने लोक खरेदी करत आहेत. शासकीय व खाजगी रुग्णालयातही रेमीडीसीवर उपलब्ध नाही. रुग्णांच्या नातेवाइकांनी इंजेक्शन आणून दिल्यास रुग्णांना ते दिले जाईल असे सांगितले जात आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाचे यावर थेट नियंत्रण अपेक्षित असून दररोज किती साठा उपलब्ध आहे किती विकला गेला याची माहिती त्या विभागाकडे दिली गेली पाहिजे. आता रुग्ण संख्या वाढल्यामुळे कृत्रिम टंचाई निर्माण करून लोकांची लूट केली जात आहे. यामुळे प्रशासनाने काळाबाजार करणार्‍यांवर कडक कारवाई करावी या मागनीचे  निवेदन स्वप्नील इंगळे पाटील यांनी दिले आहे.No comments:

Post a Comment

Pages