किनवट ला कोरोना संक्रमण जोरात; रेमेडीसिव्हर इंजेक्शन ची कमतरता; तालुका प्रशासनात समन्वयाचा अभाव; कोरनाकडे लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष. - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 9 April 2021

किनवट ला कोरोना संक्रमण जोरात; रेमेडीसिव्हर इंजेक्शन ची कमतरता; तालुका प्रशासनात समन्वयाचा अभाव; कोरनाकडे लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष.

किनवट, ता.९ : किनवटला  बुधवारी(ता.७) एकशे दहा पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेत. मागील काही दिवसापासून दररोज १०० च्या आसपास पॉझिटिव्ह रुग्ण येत आहेत. अशातच जिल्हा प्रशासनाकडून केवळ १० रेमडेसिवीर इंजेक्शनची    उपलब्धता आहे. व्हेंटिलेटर आहेत. परंत, व्हेंटिलेटर चालवणारे तज्ञ व्यक्ती उपलब्ध नसल्याने व्हेंटिलेटर ही धूळ खात पडून आहेत.यामुळे रुग्णांची गैरसोय वाढत आहे. 

   तसेच रुग्णालयात hrct scan, c.t.scan व  रक्त तपासणी करणारी यंत्रणा नसल्याने रुग्णांना नाईलाजाने यवतमाळ, नांदेड, हैदराबाद किंवा आदिलाबादला जावे लागते आहे, ही गंभीर बाब आहे. धनवान रुग्णांना हा खर्च परवडण्यासारखा आहे परंतु गोरगरीब रुग्णांना शासकीय रुग्णालयाच्या सोयीसुविधा वरच अवलंबून राहावे लागते.

   सहाय्यक जिल्हाधिकारी, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक, तहसीलदार, नगर परिषदेचे मुख्य अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी नगर परिषदेचे मुख्याधिकारी हे तालुका प्रशासनातील महत्त्वाची पदे आहेत. कोविड संदर्भाने काय कोविड सेंटर मध्ये काय सोयीसुविधा उपलब्ध आहेत? किती काटा उपलब्ध आहेत ? कीती रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध आहेत ? याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर संजय मुरमुरे यांच्याकडे विचारली असता त्यांनी सदरील माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर धुमाळे यांच्या कडून घ्यावी असे सांगितले. वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर धुमाळे व तहसीलदार यांच्याकडे उपरोक्त माहितीची मागणी केली असता त्यांच्याकडूनही  काहीही प्रतिसाद मिळाला नाही. यावरून कोविड  संदर्भाने तालुका प्रशासनात कुठला समन्वय असल्याचे दिसून आले नाही. राष्ट्रीय आपत्तीच्या काळात प्रशासनामध्ये समन्वय नसणे ही चिंतेची बाब असल्याचे शहराचे नागरिक बोलत आहेत. जिल्हा प्रशासनाकडून दररोज कोविड संदर्भाने प्रसिद्धी पत्रक प्रसिद्धीस देऊन सविस्तर माहिती सांगितली जाते. परंतु, तालुका प्रशासनाला अशी माहिती द्यावी याची गरज भासत नाही हे दुर्देवी आहे. यातच लोकप्रतिनिधीही या आजाराबद्दल अनास्था दाखवीत आहेत, यामुळेही नागरिकांना योग्य मदत वेळेवर मिळत नाही. किनवट हा मराठवाड्यातील दुर्गम व डोंगराळ भागात वसलेला एकमेव आदिवासी तालुका आहे. नांदेड या जिल्हा मुख्यालयापासून १५० किलोमीटर अंतरावर वसलेला हा तालुका आहे. नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदाची निवडणूक नुकतीच संपन्न झाली. या निवडणुकीत भाजप व काँग्रेस कडून मते मिळविण्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च करण्यात आला. परंतु, कोरोना सारख्या महामारीतही कोरोना  बाधितांना एकाद्या लोकप्रतिनिधीने टोस मदत केली, अशे कुठेही आढळून आले नाही. या तालुक्यात आरोग्य व्यवस्थेची अशी हेळसांड होत असेल तर या तालुक्यातील जनतेने कुणाकडे पाहायचे असा प्रश्न उपस्थित होत आहे.

No comments:

Post a Comment

Pages