किनवट, दि.२६: सिद्धार्थ नगर येथील जेतवन बुद्ध विहारात आज (दि.२६)"बौद्ध पौर्णिमा", हर्षोल्हासात साजरी करण्यात आली. प्रारंभी पंचशील ध्वजारोहण करण्यात आले. प्रा.सुबोध सर्पे यांनी बुध्द वंदना घेतली व सूत्रसंचालन केले. याप्रसंगी आनंदराव ठमके यांनी समयोचित विचार व्यक्त केले.
यावेळी वंचित बहुजन आघाडी चे माधव कावळे, अखिल भारतीय बौद्ध उपासक संघाचे राज्य सहसचिव ॲड. मिलिंद सरपे, यादव नगारे, क्रांतिसूर्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष रमेश मुनेश्वर , मनोहर पाटील, कपील कावळे, राजेश पाटील , शिलरत्न कावळे, सुगत नगराळे, विशाखा महिला मंडळाच्या कचरूबाई मुनेश्वर, सुशिला ठमके, जयमाला आळणे, सिंधु कांबळे, सारजा कावळे,राही पाटील, लक्ष्मी पाटील, सूर्यकांता सर्पे, कृष्णावती धोटे, अॅड दिव्या सर्पे, रोहीनी मुनेश्वर, वर्षा ठमके, प्रतीक्षा ठमके, करुना पवार, वनीता पाटील , ललीता मुनेश्वर, रत्नमाला भरणे, सुजाता भरणे, रामबाई ठमके, सोमीत्रा कावळे, ज्योती कावळे, सुधाबाई परेकार, योजना पाटील, प्रभाबाई कापसे, शेशीकला कावळे, कौशल्या मुनेश्वर यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
सिध्दार्थ नगर नवयुवक मंडळचे निखील कावळे, गौतम पाटील, आकाश सर्पे, निखिल सर्पे, सुमेध कापसे, शादाब खुरेशी,सचीन कावळे, आनंद कावळे, प्रतीक नगराळे, शुभम भवरे, बंटी भवरे, निवेदक कानींदे, गुडु भरणे, सिद्धार्थ भरणे, आदर्श येरेकार यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी पुढाकार घेतला.
No comments:
Post a Comment