केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांची माजी खासदार हरिभाऊ राठोड यांच्या नेतृत्वात आरक्षण हक्क कृती समितीने घेतली भेट ; पदोन्नतीमधील आरक्षणाबाबत ना.रामदास आठवले करीत असलेल्या प्रयत्नांचे मानले आभार - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 19 June 2021

केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांची माजी खासदार हरिभाऊ राठोड यांच्या नेतृत्वात आरक्षण हक्क कृती समितीने घेतली भेट ; पदोन्नतीमधील आरक्षणाबाबत ना.रामदास आठवले करीत असलेल्या प्रयत्नांचे मानले आभार

मुंबई दि.19- रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना रामदास आठवले यांची माजी खासदार हरिभाऊ राठोड यांच्या नेतृत्वात आरक्षण हक्क कृती समितीने आज भेट घेतली. पदोन्नतीमधील मागसावर्गीयांचे  आरक्षण रोखून  महाराष्ट्र राज्य सरकारने अन्याय केला आहे. याबाबत शिष्टमंडळाने ना रामदास आठवले यांच्याशी चर्चा केली. पदोन्नती मधील आरक्षणासाठी  येत्या दि. 26 जून रोजी आरक्षण हक्क कृती समिती तर्फे राज्यभर आंदोलन करण्यात येत असून या आंदोलनाला पाठिंबा द्यावा या मागणी चे निवेदन यावेळी ना रामदास आठवले यांना आरक्षण हक्क कृती समिती तर्फे देण्यात आले.यावेळी झालेल्या चर्चेत ना रामदास आठवले यांनी आणि त्यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाने पदोन्नतीमधील आरक्षणासाठी राज्यभर आंदोलन केले. ना. रामदास आठवलेंनी पदोन्नतीमधील आरक्षणसाठी चांगली भूमिका घेतल्याबद्दल आरक्षण हक्क कृती समिती तर्फे भाऊ निर्भवणे यांनी ना रामदास आठवले यांचे आभार मानले. आरक्षण हक्क कृती समिती च्या शिष्टमंडळात माजी खासदार हरिभाऊ राठोड; भाऊ निर्भवणे; आत्माराम पाखरे ; एस के भंडारे; सिद्धार्थ कांबळे; डॉ संजय कांबळे; शरद कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. 


महाराष्ट्र शासनाचा मागासवर्गीयांचे पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करणारा अन्यायकारक  शासन निर्णय रद्द करण्यसाठी आपण केंद्र सरकार च्या DOPT या विभागाने महाराष्ट्र सरकारला पदोन्नतीमध्ये मागासवर्गीयांना  आरक्षण द्यावे याबाबत चा स्पष्ट आदेश द्यावा यासाठी आपण केंद्राच्या  DOPT  विभागाला पत्र पाठविणार असल्याचे आश्वासन ना रामदास आठवले यांनी आरक्षण हक्क कृती समिती च्या शिष्टमंडळाला दिले.


              

No comments:

Post a Comment

Pages