लोकल रेल्वे चाकरमान्यांसाठी खुली करा ; लोकल रेल्वेच्या सेवा चाकरमानी कष्टकरी हातावर पोट असलेल्या वर्गासाठी पुर्ववत खुली करणेबाबत निवेदन. - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 17 July 2021

लोकल रेल्वे चाकरमान्यांसाठी खुली करा ; लोकल रेल्वेच्या सेवा चाकरमानी कष्टकरी हातावर पोट असलेल्या वर्गासाठी पुर्ववत खुली करणेबाबत निवेदन.

मुंबई  :  गेल्या वर्षी म्हणजे 2019पासून सुरू झालेल्या लॉकडाऊन नंतर केंद्रीय रेल्वे कडून सर्वसामान्य नागरिकांसाठी म्हणजे सरकारी/निमसरकारी कर्मचारी वगळता लोकल रेल्वेच्या सेवा रद्द करण्यात आल्या आहेत.


दोन वर्षांपासून मुंबई मधील सामान्य नागरिक हे प्रवासासाठी बस, व इतर सुविधांचा वापर करत आहेत. कोरोना संक्रमणाची खबरदारी म्हणून केंद्रीय रेल्वे ने हे पाऊल उचलले असल्याचे नागरिकांनी मान्य केले. परंतु आता जेव्हा मुंबई मध्ये कोरोना रूग्णांची संख्या कमी झाली आहे आणि लोकांना नोकरी, कामधंदा बघण्यासाठी मुंबई मध्ये प्रवास करणे अनिवार्य झाले आहे अश्या परिस्थितीत आपण लोकल सेवा बंद ठेवून सर्वसामान्य नागरिकांवर अन्याय करत आहात.


इतर चाकरमानी कष्टकरी हातावर पोट असलेले लोक हे आपल्या अर्थार्जनासाठी आज लोकल सेवा वापरू न शकल्याने हतबल झाले आहेत.

कारण आधीच लॉकडाऊन मुळे आर्थिकदृष्ट्या विकल झालेले नागरिक आता नोकरी कामधंदा बघण्यासाठी सर्वथा कमी दरात असलेल्या लोकलवरच अवलंबून आहेत तेव्हा त्यांना त्यापासून रोखणे म्हणजे त्यांची चूल बंद पाडण्यासाठी तुम्ही हातभार लावणे आहे.


आजाद समाज पार्टी रेल्वे च्या या क्रूर धोरणाचा निषेध करत आहे आणि विनंती करत आहे की, लवकरात लवकर लोकल सेवा चाकरमानी, कष्टकरी वर्गासाठी खुली करावी अन्यथा चाकरमानी लोकांच्या हक्कांसाठी  आजाद समाज पार्टी ही आक्रमक भुमिका घेण्यासाठी सुद्धा मागे पुढे पाहणार नाही. 

एक आठवड्यात जर लोकल सेवा पुर्ववत सुरू झाल्या नाहीत तर, आजाद समाज पार्टी चे शेकडो कार्यकर्ते लोकल ने प्रवास करून नियमभंग करतील सोबतच आक्रमक आंदोलन करतील याची नोंद घ्यावी.

No comments:

Post a Comment

Pages