दलित पँथरचे संस्थापक नेते राजा ढाले यांच्या द्वितीय स्मृतिदिनी अभिनवादन सभा संपन्न माता रमाबाई आंबेडकर नगरात ग्रंथालय स्वरूपात राजा ढाले यांचे स्मारक उभाराण्याची मागणी - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 18 July 2021

दलित पँथरचे संस्थापक नेते राजा ढाले यांच्या द्वितीय स्मृतिदिनी अभिनवादन सभा संपन्न माता रमाबाई आंबेडकर नगरात ग्रंथालय स्वरूपात राजा ढाले यांचे स्मारक उभाराण्याची मागणी


मुंबई  :  वैचारिक लेख कविता लिहिले पाहिजेत. साहित्य लिहून दलित अत्याचाराला वाचा फुटेल मात्र दलित अत्याचार रोखण्यासाठी तरुणांना संघटित करून चळवळ उभारली पाहिजे. त्यातून राजा ढाले आणि तत्कालीन दलित साहित्यिकांनी दलित पँथर ची स्थापना केली.त्यात राजा ढाले; नामदेव ढसाळ ज वि पवार आदींचा प्रमुख सहभाग होता. राजा ढाले यांनी लिहिलेल्या काळा स्वातंत्र्यदिन या लेखाने दलित पँथर संघटना म्हणून  वेगाने वाढली. दलित अत्याचाराचा मुकाबला करणारी आक्रमक संघटना म्हणून  दलित पँथर ची जगात चर्चा झाली. सर्व जगाने दलित पँथर ची दखल घेतली असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी केले. 


माता रमाबाई आंबेडकर नगर येथील शहीद स्मारक सभागृहात दिवंगत राजा ढाले यांच्या द्वितीय स्मृतिदिना निमित्त अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ना रामदास आठवले बोलत होते.यावेळी राजा ढाले यांच्या सुकन्या आणि  रिपाइं महिला आघाडी च्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष  गाथा ढाले;  ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत नेते अर्जुन डांगळे; डी एम चव्हाण;जगदीश गायकवाड; बाळासाहेब गरुड;  सुजित पगारे; माजी नगरसेवक नामदेव उबाळे; ऍड. राष्ट्रकवी जगन्नाथ आढाव ; नंदू साठे;आनंद शिंदेकर; आदी अनेक मान्यवर उपस्थित होते. 


राजा ढाले यांचे रमाबाई आंबेडकर नगरात ग्रंथालय उभारण्यासाठी खासदार निधीतून 40 लाख निधी दिला होता मात्र तांत्रिक अडचणीमुळे ते काम प्रलंबित राहिले आहे. मात्र ग्रंथालय स्वरूपात राजा ढाले यांचे स्मारक ऊभारण्यासाठी आपण सर्व प्रयत्न करूया असे ना रामदास आठवले म्हणाले. 


राजा ढाले हे प्रज्ञावंत योद्धे होते. त्यांनी आंबेडकरी चळवळीला दिलेले योगदान भरीव आणि ऐतिहासिक आहे. त्यांचे लेखन आंबेडकरी चळवळीला सदैव मार्गदर्शक आहे. दलित पँथर च्या काळात चांगला कार्यकर्ता म्हणून राजा ढाले यांनी माझ्या पाठीवर कौतुकाचा पाठिंब्याचा हात ठेवला. मला कार्यकर्ता म्हणून दलित पँथर च्या चळवळीने ओळख दिली असे सांगत ना रामदास आठवले यांनी दिवंगत राजा ढाले यांना विनम्र अभिवादन केले.

 राजा ढाले यांनी काळा स्वातंत्र्यदिन हा लेख लिहिला नसता तर दलित पँथरची ख्याती जगात झाली तेव्हढी झाली नसती असे ज्येष्ठ विचारवंत नेते अर्जुन डांगळे म्हणाले. त्यांनी दिवंगत राजा ढाले यांच्या व्यक्तिमत्व कर्तृत्वाच्या  सर्व पैलूंची ओळख करून देत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. राजा ढाले यांचे ग्रंथालय स्वरूपात रमाबाई आंबेडकर नगरात स्मारक उभारावे असे आवाहन अर्जुन डांगळे यांनी यावेळी केले. 


श्रेष्ठ ज्येष्ठ दिवंगत साहित्यिक प्रज्ञावंत योद्धा म्हणून राजा ढाले यांना सर्व मान्यवरांनी आदरांजली वाहिली.

No comments:

Post a Comment

Pages