बाबासाहेबांची वृत्तपत्र अन त्यांची नैतिक मूल्य - यशवंत भंडारे - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 14 July 2021

बाबासाहेबांची वृत्तपत्र अन त्यांची नैतिक मूल्य - यशवंत भंडारे

       डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा चौफेर संचार होता ... ज्ञानाच्या सर्वच क्षेत्रात मास्टरी असतानाही येथील  तत्कालीन वृत्तपत्र त्यांना प्रचंड ट्रोल करीत ... बाबासाहेबांना येथील उपेक्षितांना सर्व प्रकारचे हक्क मिळवून द्यावयाचे होते ... शोषण मुक्त समाज निर्माण करून सर्व क्षेत्रात समानता आणावयाची होती ... सर्वात महत्वाचे म्हणजे द्वेष मुक्त भारत करून प्रगतशील , विकासाभिमुख भारत घडवायचा होता ... युरोपियन देशाप्रमानं आपलाही देश समृद्ध , स्वयंपूर्ण आणि बलशाली झालेला .... सर्वांना समान संधी आणि प्रगती करण्याची संधी असलेल्या भारताचं स्वप्न बाबासाहेब पहात होते ... म्हणून वयक्तिक प्रगती पेक्षा त्यांनी उपेक्षित समाजाला देशाच्या  मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जीवाचं रान केलं ... त्यांच्या याच भूमिकेला विरोध करण्यासाठी आणि महात्मा गांधी यांच्याशी असलेल्या कृतिशील कार्यक्रमाबाबतच्या मतभेदाचा चुकीचा अर्थ लावून म . गांधी भक्त वृत्तपत्र बाबासाहेबांवर टोकाची टीका करत असत ... ज्यास आपण आज ट्रोल म्हणतो ... बाबासाहेबांनी त्यांची भूमिका , मत , विचार आणि त्यांचा कृतिकार्यक्रम आपल्या अनुयायांना आणि इतरांनाही कळवावा , समाज प्रबोधन होऊन प्रगतीची दिशा लोकांना दाखवावी म्हणून वृत्तपत्र सुरू केली ... तो काळ वृत्तपत्राच्या उत्पन्नातून नफा कामावण्याचा कुणासाठीही नव्हता ... विचार लोकांपर्यंत घेऊन जाण्याचं साधन म्हणून वृत्तपत्रकडं पाहिलं जातं असे ... तोच दृष्टिकोन वृत्तपत्राबाबत बाबसाहेबांचाही होता ... त्यामुळचं त्यांनी प्रथम *मूकनायक*  त्यानंतर              *बहिष्कृतभारत* , *जनता* आणि स्वत्र्यांनातर *प्रबुद्धभारत* ही वृत्तपत्र  काढली ... वृत्तपत्रांच्या नावावरूनच त्यांच्या बदलत्या वैचारिक दृष्टिकोनाची प्रचिती येते ... मूकनायक हे वृत्तपत्राला  नाव  देताना तत्कालीन मूक असलेलल्या  ... ज्यांचा कोणी वाली नाही अशा  ... ज्यांचा आवाज कुणी ऐकून घेतच नाही अशा समाज घटकांचा आवाज होण्यासाठी ... त्या मूक समाजाचा नायक होऊन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी मूकनायक हे नाव प्रथम त्यांच्या वृत्तपत्रास दिलं ... दुसरं नाव त्यांनी त्यांच्या वृत्तपत्रास दिलं ते बहिष्कृत भारत ... आपल्या देशात नागरिकांचा एक मोठा समाजघटक  बहिश्कृतांचं जीवन जगत असून या देशात एक असा बहिष्कृत भारत आहे ... असचं त्यांनासांगावयाचं होतं ... *जनता* हे वृत्तपत्राला नाव देताना त्यांना *people* अर्थात या देशातील संपूर्ण नागरिक , *जनता* यासाठी विचार द्यावयाचा होता ...म्हणून त्यांनी त्यांच्या वृत्तपत्रास  *जनता* असं नाव दिलं ...  त्यानंतर *समता* असं नाव वृत्तपत्रास दिलं ... त्यांना समाजात समता प्रस्थपित करावयाची होती ... समता अधिष्टीत समाजाचं त्यांचं स्वप्न होतं ... शेवटी त्यांनी त्यांच्या वृत्तपत्रास  *प्रबुद्ध भारत* असं नाव दिलं ... आपला हा देश प्रबुद्ध म्हणजेच प्रज्ञावान व्हा ... प्रज्ञावंतांची येथे उपज व्हवी ... बुद्धाच्या विचारांची कास नागरिकांनी धरून विवेकनिष्ठ , विज्ञाननिष्ठ व्हावे असाही त्यांचा हे नाव वृत्तपत्रास देताना हेतू असावा ... *१४ जुलै १९४०* रोजी  मुंबई विभागातील स्वतंत्र मजूर पक्षाच्या कार्यकारी मंडळाला मार्गदर्शन करताना  त्यांनी दिलेला संदेश खूप महत्त्वाचा आहे ... ते म्हणतात   " स्वतंत्र मजूर पक्षाचे विविध सामाजिक  कार्य प्रगतीपथावर नेण्यासाठी  भारत भूषण प्रिंटींग प्रेस आणि             " जनता " साप्ताहिक " चालू ठेवणे अती आवश्यक आहे ... नवीन पिढीने ही जबाबदारी सांभाळणे आवश्यक आहे .." असं सांगितलं होतं ...१४ जुलै १९५२ रोजी  दामोदर हॉल मुंबई येथील मागासवर्गीयांच्या सभेला मार्गदर्शन करतांना बाबासाहेबांनी त्यांच्याकडील १ लाख ११ हजार २२६ रुपये ४ आणे आणि ३ पैसे येवढ्या इमारत निधीचा हिषेब सादर केला होता ... या निधितून समाज कार्य आणि  विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी निधी मिळविण्यासाठी या इमारतीचा वापर व्हावा असे सांगितलं  होतं ...  हा निधी ट्रस्ट कायद्याखाली " शेड्युल्ड कॉस्ट इंप्रुव्हमेंट ट्रस्ट " मुंबई येथे वळता केला असल्याचे सांगितलं होतं ... बाबासाहेब सार्वजनिक पैशाच्या हिशोबाबत आणि त्यांच्या योग्य वापराबाबत प्रचंड सजग होते ... कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी सार्वजनिक निधीचा काटेकोरपणे हिशोब ठेवावा आणि तो जनतेला सादर करावा , असा त्यांचा आग्रह असे ... बाबासाहेबांनी 

कोणत्याही संघटणेच्या प्रगतीसाठी  आर्थिक सादर करणं  आवश्यक असल्याचं त्यांच्या कृतीतून दाखवून दिलं  आहे... आज मात्र सार्वजनिक निधी म्हणजे आपलीच मालमत्ता म्हणून तिचा स्वतःसाठी वापर करणारी आणि हिशोब विचरणाऱ्याचं धमकावणारी पुढारी -- कार्यकर्ते सर्वत्र आढळतात ... बाबासाहेबांच्या जीवनातील  नैतिक मूल्य स्वीकारण्याची कुणाचीही हिंमत होतं नाही ...असचं म्हणावं लागतं ...बाकी सर्व ताकत जय जय करात खर्ची पडते ... अनुकरणाबाबत सर्वत्र बोबाबोबच आहे ...

  

                                         -   यशवन्त भंडारे


                        


                     No comments:

Post a Comment

Pages