भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त स्वातंत्र्यवीरांचे स्मरण करा -केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले ; आम्ही पुणेकर संस्थेच्या वतीने मेरा भारत महोत्सव ७५ उपक्रमाच्या बोधचिन्हाचे अनावरण - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 14 July 2021

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त स्वातंत्र्यवीरांचे स्मरण करा -केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले ; आम्ही पुणेकर संस्थेच्या वतीने मेरा भारत महोत्सव ७५ उपक्रमाच्या बोधचिन्हाचे अनावरण

 मुंबई दि. 14 -   १५० वर्षे इंग्रजांनी आपल्या देशावर राज्य केले. अनेक नेत्यांच्या संघर्षातून  आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक;  महात्मा गांधी यांनी स्वातंत्रचळवळीत मोलाचे योगदान दिले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेल्या संविधानामुळे आपला देश एक आहे.  भारताच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या वीरांचे स्मरण स्वातंत्र्याच्या   ७५ व्या वर्षानिमित्त करायला हवे आणि त्यांच्या स्मृती जागवायला हव्यात, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. 


स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आम्ही पुणेकर संस्था आणि देशभरातील 75 सामाजिक संस्थांतर्फे आयोजित मेरा भारत महोत्सव ७५ या उपक्रमाच्या बोधचिन्हाचे अनावरण केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते मुंबईत करण्यात आले. यावेळी आम्ही पुणेकर संस्थेचे हेमंत जाधव, डॉ. स्वप्नील शेठ, समीर देसाई, प्रणव पवार, संतोष फुटक, उत्तमराव मांढरे  संतोष पोतदार,पं. वसंतराव गाडगीळ उपस्थित होते. 


आगामी वर्ष हे भारताच्या स्वातंत्र्याचे 75 वे वर्ष आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन आम्ही पुणेकर या संस्थेसह देशभरातील 75 सामाजिक संस्था एकत्रित येऊन आगळ्यावेगळ्या पद्धतीने हा स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करणार आहेत. 


हेमंत जाधव म्हणाले, मेरा भारत महोत्सव ७५ या उपक्रमात सांस्कृतिक, क्रिडा, स्वातंत्र्यवीरांचा संघर्ष दाखविणारा चित्रपट महोत्सव व प्रदर्शन यांसह विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. 75 सामाजिक संस्थाच्या माध्यमातून देशभर हे कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. काश्मीर ते कन्याकुमारी, सोमनाथ ते कलकत्ता या स्वातंत्र्याची गाथा सांगणाऱ्या यात्रेचेही आयोजन करण्यात येणार आहे. देशाच्या स्वातंत्र्याचा 75 वर्षांचा इतिहास आणि स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या वीरांचे स्मरण करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. मेरा भारत महोत्सव ७५ या उपक्रमाचा अहवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सादर करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.


           

No comments:

Post a Comment

Pages