किनवट तालुका ओला दुष्काळ जाहिर करा ; निवासी जिल्हाधिकारी यांना ज्वलंत प्रश्ना संदर्भात मा.क.पा चे निवेदन ; अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्या - काॅ.अर्जुन आडे - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 24 July 2021

किनवट तालुका ओला दुष्काळ जाहिर करा ; निवासी जिल्हाधिकारी यांना ज्वलंत प्रश्ना संदर्भात मा.क.पा चे निवेदन ; अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्या - काॅ.अर्जुन आडे

नांदेड ,दि. :  सतत च्या पाऊसाने किनवट तालुक्यात प्रचंड नुकसान झालेले आहे.अतिवृष्टी मुळे किनवट तालुक्यात इस्लापूर, जलधरा,शिवणी, अप्पारापेठ भागात शेत जमिनी सर्व खरडून निघाल्या आहेत.प्रंचड मोठ्या प्रमाणात शेतीजमीनि,पिकॆ वाहुन गेली आहेत. तातडीने शासन प्रशासनाने पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी किसान सभेच्या वतिने निवासी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.मोदि सरकारने केलेले तिन शेती कायदे परत घ्या,हामिभाव - हामि खरेदिचा कायदा करा.

त्याचासोबत जनतेचे विविध ज्वलंत प्रश्न प्रलबींत घरकुल, आवास योजना, राशन, पेंशन, फुटलेले रस्ते, पाण्यात वाहुन गेलेले पुल, किसान सन्मान योजना,पिक विमाचे वाटप, विविध गावातील पांदान रस्ते, वन जमिन गायारण जमिनी चे पट्टे, पांगरपाड गावची आवास योजना पोर्टल ला नोंद ,पांगरी येथील पाझर तलाव, मुळझरा-पांगरपाड- तोटंबा - तेलंगाना बार्डर पर्यंतची जोड रस्ते, अप्पारापेठ येथील बॅक, गोंडजवली - गोंडेमहागाव, तोटंबा, मार्लागोंडा -अप्पारापेठ -शिवणी भागातील नाल्या लगत झालेले शेतीचे प्रंचड नुकसान, शिवणी येथील नविन बस स्थानक व शौचालय,बॅक मार्फत कर्जमाफिची अंबलबजावनी, कर्ज वाटप प्रकियेत वेग, सतत जाणारी विज सुरळीत करणे, रोजगार हामीची कामे, नेटवर्क नसलेल्या गांवाना नेटवर्क जोडणी,इस्लापुर, शिवणी, अप्पारापेठ भागातील सर्व मुख्य रसत्यावरिल पुलांची तातडणिने दुरूस्ती तथा इत्यादी २७ मागण्या निवेदनाद्वारे  निवासी जिल्हाधिकारी यांना करण्यात आल्या. तसेच सर्व संबंधित विभागांना तातडीने मागण्या संदर्भात योग्य ती कार्यवाही करण्याचे कळवावे, अशी विनंती करण्यात आली.

     निवेदनात करण्यात आलेल्या मागण्या बाबद तोडगा न काढल्यास ९ आॅगस्ट क्रांती दिनापासून इस्लापूर येथे बेमुदत आंदोलन करणार, असे ही निवेदनात म्हटले आहे.

यावेळी किसान सभेचे राज्य कार्याध्यक्ष काॅ.अर्जुन आडे ,मा.पं.स सदस्य शेषेराव ढोले, काॅ.प्रभाकर बोड्डेवार, काॅ.अनिल आडे ,काॅ.खंडेराव कानडे, काॅ.गंगाधर गायकवाड, काॅ.विनोद गोविंदवार ,काॅ.जनार्दन काळे,आदि उपस्थित होत.

No comments:

Post a Comment

Pages