अभियांत्रिकी व तंत्रज्ञान प्रथम वर्षाच्या प्रवेश नोंदणीस मुदतवाढ - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 31 July 2021

अभियांत्रिकी व तंत्रज्ञान प्रथम वर्षाच्या प्रवेश नोंदणीस मुदतवाढ


नांदेड, दि. 31  :- शैक्षणिक वर्ष 2021- 22 साठी अभियांत्रिकी व तंत्रज्ञानच्या प्रथम वर्षाच्या प्रवेश नोंदणीस शुक्रवार 6 ऑगस्ट 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. दहावीनंतर 3 वर्ष कालावधीची पूर्णवेळ पदविका अभियांत्रिकी व तंत्रज्ञानच्या प्रथम प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाइन नोंदणी, कागदपत्रांच्या छायांकित प्रती अपलोड करणे, कागदपत्रे पडताळणी, अर्ज निश्चित करण्यास ही मुदतवाढ देण्यात आली आहे. 


ऑनलाईन अर्ज भरणे व निश्चित करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार ई-स्क्रुटीनी, प्रत्यक्ष स्क्रुटीनी, छाननी पद्धतीची माहिती, प्रवेश पात्रतेचे निकष, अर्ज भरण्यासाठी लागणारे शुल्क, उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना आदी बाबी संचालनालयामार्फत प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. दहावीचा निकाल लागण्यापूर्वी पदविका प्रवेश प्रक्रिया नोंदणीस सुरुवात झाली होती. दहावीचा निकाल लागल्यानंतर तंत्रनिकेतन प्रवेशासाठी विद्यार्थी येत आहेत. सीबीएससी बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर होणे आहे. नुकतीच झालेली राज्यातील पूर परिस्थिती, विद्यार्थ्यांचे जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्रास लागणारा विलंब या बाबी लक्षात घेऊन विद्यार्थी प्रवेश अर्ज 6 ऑगस्ट पर्यंत भरु शकतील. त्रुटीच्या पुर्तता ही  10 ते 12  ऑगस्ट 2021 दरम्यान करता येईल. शासकीय तंत्रनिकेतन नांदेड येथे प्रवेश मदत केंद्र शनिवारी व रविवार तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी चालू असल्याने जास्तीत-जास्त विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन नांदेडच्या शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. गोरक्ष गर्जे यांनी केले.


No comments:

Post a Comment

Pages