लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आजी माजी विद्यार्थ्यांचे नागसेनवनात वृक्षारोपण - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 1 August 2021

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आजी माजी विद्यार्थ्यांचे नागसेनवनात वृक्षारोपण

औरंगाबाद : 

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या 101 व्या जयंतीनिमित्त मिलिंद नागसेनवन स्टुडंन्ट्स वेल्फेयर असोसिएशन व पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या आजी माजी विद्यार्थ्यांच्या वतीने "माझ्या नागसेनवनात एक वृक्ष माझाही " ह्या वृक्षारोपण अभियानातंर्गत वृक्षारोपण करण्यात आले.

ह्यावेळी माजी विद्यार्थी तथा गृहविभाग मंत्रालय येथील अधिकारी अमोल झोडपे यांनी अभियानाला खड्डे करण्याचे (अर्थ ऑगर मशीन) यंत्र भेट दिले.

ह्यावेळी वड, पिंपळ,चाफा,मोहगणी,सप्तपर्णी, लिंब आदी वृक्ष लावण्यात आले तर जेष्ठ नेते श्रावण दादा गायकवाड ,डॉ.आंबेडकर विधी महाविद्यालयाचे प्राचार्य.डॉ.प्रमोद हिरोडे सर,असोसिएशनचे अध्यक्ष सचिन निकम, सचिव ऍड.अतुल कांबळे, कोषाध्यक्ष डॉ.किशोर वाघ,रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रा.सिद्धोधन मोरे,जेष्ठ पत्रकार कैलास वाहुळ सर,मिलिंद भाई थोरे,बुद्धभूषण निकाळजे,गुणरत्न सोनवणे,विकास रोडे,ऍड.तुषार अवचार,किरण शेजवळ,प्रकाश उजगरे,प्रवीण हिवराळे,सतीश शिंदे, ऍड.रत्नदीप कांबळे,देवेंद्र मोरे,प्रवीण सदावर्ते,गुलशन शहारे, आकाश पातोडे, अजय सांगळे,रजनीकांत चावरे आदींची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment

Pages