जनसाहस च्या माध्यमातून कामगारांना जीवणावश्यक वस्तूंचे वाटप - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 2 August 2021

जनसाहस च्या माध्यमातून कामगारांना जीवणावश्यक वस्तूंचे वाटप

 


मुंबई : ‘जन साहस’ संस्था गेल्या वीस वर्षांपासून समाजातील मागास व वंचित घटकांसोबत काम करीत असून विविध उपक्रम राबवित आहे. सन २०२० साली मध्यप्रदेशातील ‘देवास’ या ठिकाणी त्यांनी ‘गरिमा अभियान’ राबविले त्यात मलमुत्र साफ करणाऱ्या महिलांसोबत काम केले आणि त्यांना त्या कामातून बाहेर काढण्यात व समाजातील मुख्य प्रवाहात शामिल करण्यासाठी ‘जण साहस’ ने आपले योगदान दिले आहे. त्या सोबतच विविध सरकारी योजनांचा लाभ इत्यादी गोष्टींसोबत महिला व बाल अत्याचविरोधात ही संघटन सातत्याने काम करीत आहेत. विशेष म्हणजे ‘जण साहस’ महाराष्ट्रासह एकून अकरा राज्यात या विषयावर काम करत आहे


जन साहसच्या ‘Migrant Resilience Collaborative’ या उपक्रमाअंतर्गत मुंबई व महाराष्टातील अनेक जिल्ह्यांमध्ये स्थलांतरित कामगारांसाठी काम करीत आहे. या प्रोजेक्टच्या माध्यमातून राज्यातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील १० कोटी कामगारांना साहाय्य करण्यात येणार असून भारतातील १०० जिल्यामध्ये हा प्रोजेक्ट राबविण्यात येत आहे. याअंतर्गत त्यांची नोंदणी, सामाजिक व आर्थिक प्रश्न आणि त्यांना मिळणाऱ्या शासनाच्या विविध योजनाबद्दल जागृत करणे जसे BOCW  कार्ड (लेबर कार्ड) इत्यादी साठी साहाय्य व मार्गदर्शन करणे हे संस्थेचे प्रमुख काम असणार आहे.


कोवीड १९ आणि लॉकडाऊनमुळे कामगारांची झालेली वाताहत आणि कामाचा अभाव लक्षात घेऊन ‘जन साहस’ ने स्थलांतरित कामगारांना अन्नधान्य वाटप करण्याचे ठरवले असून या उपक्रमाअंतर्गत आज रोजी ‘जन साहस’ संस्थे तर्फे नेरूळ नाका, मुंबई उपनगर येथील २३७ कामगारांना रेशन किट त्यामध्ये प्रामुख्याने रोजच्या वापरातील जीवनावशयक वस्तू, मास्क तसेच महिलांसाठी सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात आले. तसेच ‘जन साहस मजदुर हेल्पलाईन क्रमांका’ची १८००२०००२११ घोषणाही करण्यात आली. यावेळी जन साहस संस्थेचे महाराष्ट्र राज्य समन्वयक, अक्षय मेरजी, मुंबई उपनगर जिल्हा समन्वयक समीक्षा ठाकरेजी, चेंबूर सेंटर समन्वयक रामेश्वर भाले, आनंद काळे व त्यांचे सहकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages