शाहीर उत्तमराव म्हस्के यांचे प्रबोधन चळवळीतील योगदान - महेंद्र नरवाडे - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 2 August 2021

शाहीर उत्तमराव म्हस्के यांचे प्रबोधन चळवळीतील योगदान - महेंद्र नरवाडे


     शाहीर उत्तमराव म्हस्के हे उत्तम कवी, गायक  आहेत.यांचा जन्म १२मार्च१९५४साली औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील गेवराई गुंगी येथे झाला. सध्या ते सिडको एन.-६औरंगाबाद येथे राहतात.त्यांचे प्राथमिक शिक्षण गावात व गावा शेजारच्या गावात झाले असून डॉ.बाबासाहेब आंबेडकर कला वाणिज्य महाविद्यालय , औरंगाबाद येथे बी.ए. पदवी पर्यंत झाले.

   बालपणी त्यांच्या गावात त्यांचे मोठे भाऊ दशरथ म्हस्के हे चावडीवर प्रत्येक हप्त्याला वामनदादा कर्डक यांची गीते  गायाचे ती गीतं उत्तमराव मन लावून ऐकायचे यातून गायणाची आवड निर्माण झाली.चौथी-पाचवीत असतांना शिक्षकांनी कवीता चालीवर म्हणायला लावल्या. त्यांच्या सोबत वर्गातील मुलंही कवीता चालीवर म्हणु लागली.दहावीला असतांना नाटकात ही गीत गायले यातूनच गायणाचा छंद जडला. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संस्थेतून शिक्षण घेऊन १९७८ला बाहेर पडल्यानंतर औरंगाबाद येथे सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये रोड कारकुन म्हणून नौकरी लागली.पोटापाण्याचा महत्वाच्या प्रश्न सुटला.येथे ३६वर्षे नौकरी केली.

       लोककवी वामनदादा कर्डक यांचा सहवास लाभलेले शाहीर उत्तमराव म्हस्के यांनी धम्मप्रचार गायन पार्टी स्थापन करून त्यात ढोलक वाजवून वामनदादा कर्डक यांची गीतं गायाला सुरुवात केली.संचात नागसेन नगरचे अशोक बनकर पेटी तर अशोक उमरे ब्यांजो वाजवायचे .सोबत साथ संगतीला सखाराम साळवे,बाबु सदाशिवे,सुदाम गायकवाड ,सांडु बनकर व दुसरे एक गायकवाड असायचे. औरंगाबादमध्ये प्रत्येक नगर मध्ये तसेच औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पिंपळगाव कोलते,टाकळी कोलते,धामनगाव,वाणेगाव,चौका,शिल्लोड, शेलगाव,फुलंब्री, खुलताबाद, इत्यादी गावात जयंती निमित्त प्रबोधन पर बुद्ध भीम गीतं गाऊन जनप्रबोधन केले. त्यांची अर्धांगिनी शकुंतला  यांनी या कामी त्यांना  आवड असल्याने कार्यक्रमाला जाण्यासाठी कसलीही अडचण न करता प्रोत्साहन दिले. कवीता,कथा लिहल्या.जवळजळळ  १५०० गीतं लिहिले.कार्यक्रमाधिकारी रणदिवे साहेब यांच्या पुढाकाराने आकाशवाणी केंद्र औरंगाबाद येथे काव्यवाचन,कथाकथन,व नभनाट्य सादर केले.

    समाजातील अज्ञान,अंधश्रद्धा व विषमता दूर सारून तधागताचा विज्ञानवादी धम्म व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरक विचाराने प्रभावित होऊन

समाजजागृतीचे  कार्य आजतागायत चालू आहे.आखिल भारतीय फुले,शाहु, आंबेडकर जनजागृती कलामंच प्रस्तुत "तुफानातले दिवे आम्ही,तुफानातले दिवे "हा बुद्ध-भीमगीतांचा बहारदार कार्यक्रम ते सादर करतात. त्यांनी लिहलेली गीतं अनेक नामवंत गायकांनी गायली आहेत.

  प्रज्ञाचक्षु गायिका अनिता मोकळे यांनी दोन ध्वनीमुद्रीकेत (क्यासेटमध्ये) गीतं गायली आहेत.आनंद भवरे, यवतमाळ, मारोती शेलार ठाणे, अशोक सरवदे,पुणे, विकास घोरपडे, धनवटेकल्यान व उषाबाई शेजुळे, मुंबई,संजय बागुल, वैजापूर या गायकांनी त्यांची अनेक गीते गायली  यातील काही गीते यु ट्युबवर व समाजवाणी या सोसियल मिडिया वाटसप गृपवर आजही ऐकायला मिळत आहेत.

मनपसंत गीतं

     १)शांती समतेचा मार्ग मिळाला

वंदन भीमाला आणि गौतमाला.

२) घटना ही भारताची शान

     आहे ती आमचा प्राण

     दिले इथे हक्क समान

३) जगी झाला एकच भीम कैवारी

   आली जागणारी आणि तारणारी

माझ्या भीमाची लेखणी ती भारी

४)दिला भीमाने सहारा आम्हाला

   जाळुन मडं मनुचं

   केलंभीमानं खुलं आम्हाला

   पाणी चवदार तळ्याचं

५)गेली माय माऊली माता रमाई

    कोटी लेकरांना आता माय नाही

संदेश

    डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपणास तथागतांचा धम्म दिला त्याचवेळी २२प्रतिज्ञाही दिल्या त्याचे पालन करा.एकतेने राहून हक्कासाठी लढत रहा . अंधश्रद्धा दूर सारा. असा संदेश ते वामनदादा कर्डक यांच्या व स्वरचित गीत काव्यातून समाजाला देतात. त्यांच्या अखंड प्रबोधन कार्यास हार्दिक शुभेच्छा! धन्यवाद.

         लेखक-महेंद्र नरवाडे,किनवट

          मो.न.७०६६६५०३६६

No comments:

Post a Comment

Pages