मानवी मनात धम्म रुजविनारा अवलिया बोद्धाचार्य रमेशजी गोपणारायन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 6 August 2021

मानवी मनात धम्म रुजविनारा अवलिया बोद्धाचार्य रमेशजी गोपणारायन
   अडीच हजार वर्षांपूर्वी आपल्या अमोघ वानिने आणि आपल्या विचाराने जगाला भुरळ घालणारे महामानव म्हणजे तथागत गौतम बुद्ध हे होय .त्याच महामानवाने आपला विचार जगभरात ज्या तत्वज्ञानाने पोहचविला त्यास धम्म असे म्हटले जाते. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी एक नवा शब्द शिकवला आणि त्यातून जुने जग उलथवण्याची शक्ती असलेले साहित्य उभे राहिले "तो शब्द म्हणजे धम्म".  धम्म हा मानवतावाद शिकवतो तथागतांनी ८४ हजार स्कंधातून आपला धम्म जगाच्या कल्याणासाठी आहे असे सांगितले आहे. तोच तथागतांनी सांगितलेला विचार घेऊन मानवी मनात धम्माचा विचार रूजविन्यासाठी व लोकांनी आपल्या स्व जिवनात अंगिकारून स्वतःचा उत्कर्ष करुन घ्यावा , ह्यासाठी देह झिजविनारे बोद्धाचार्य रमेशजी गोपनारायण, अकोला हे स्वतः अशिक्षित असूनसुद्धा चळवळीप्रती आपली निष्ठा दाखवत तथागतांनी सांगितलेला धम्म विचार (विज्ञानवाद) डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला जगण्यासाठीचा मूलमंत्र (शिका! संघटित व्हा! संघर्ष करा!) व सम्राट अशोकाने केलेल्या अनेक धम्मरूपी कार्याचा (शिल्प, विहार, स्तंभ इत्यादी.) या सारख्या कार्यातून बोध घेत आपल्या जीवनाला त्याच मार्गावरून मार्गस्थ करणारा हा अवलिया स्वतःच्या शारीरिक व्याधींना मागे सारून आणि आपल्या अर्धांगिनीला सोबत घेऊन, स्वतःचा आदर्श समाजापुढे मांडत आहे. गावात स्वकष्टातुन भव्य बुद्धविहार बांधण्याचे कार्य पार पाडले, भगवान बुद्धांच्या विचारावर आधारित बौध्द संगतीनंतर त्रिपिटक या साहित्याची निर्मिती झाली. त्याच साहित्याचा प्रभाव लेखकांच्या मनावर बिंबला गेला. त्यांना त्रिपिटकातील अनेक गाथा, वचने पाठ असून यातुन त्यांच्या बुद्धीचा व्यासंग दिसून येतो. याच पठीत असलेल्या अनेक बुध्दविचारांचा संग्रह म्हणून त्यांनी स्वलिखित एक छोटेखानी "धम्मदृष्टी" हे पुस्तक प्रकाशित केले आहे. यातून समाजाच्या प्रती असलेली आपुलकीची भावना , तथागताच्या प्रती असलेला आदरभाव, व चळवळीसाठीचे समर्पण यातून दिसून येते. .....    

      "अत्तहि अत्तनो नाथो, को हि नाथो परो सिया"..              (अर्थ -तूच तूझ्या जिवनाचा शिल्पकार..)      


                           निलेश वाघमारे ..8180869782

No comments:

Post a Comment

Pages