डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना प्रत्यक्ष पाहिलेले ...प्रसिद्ध कव्वाल भाऊराव लोखंडे यांचे प्रबोधन चळवळीतील योगदान - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 30 August 2021

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना प्रत्यक्ष पाहिलेले ...प्रसिद्ध कव्वाल भाऊराव लोखंडे यांचे प्रबोधन चळवळीतील योगदान

   प्रसिद्ध कव्वाल भाऊराव लोखंडे हे आंबेडकरी चळवळीतील प्रतिभावंत कवी, गीतकार ,व कव्वाल असून प्रबोधन चळवळीत त्यांचे  अतुलनीय योगदान आहे.यांचा जन्म एक जुन1939साली वर्धा जिल्ह्यातील हिंगनघाट तालुक्यातील नांदगाव (बोरगाव) येथे झाला.त्यांचे शिक्षण दहावी पर्यंत हिंगणघाट येथेच झाले.त्यांनी वयाच्या १७व्या वर्षी १४ ॲाक्टोबर१९५६रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत नागपूर मुक्कामी धम्मदिक्षा घेतली.तथागत भगवान बुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणादायी विचारांने प्रेरीत होऊन गीतगायन ,गीत ,कवीता लेखन व शेरशायरी हे त्यांचे आवडते छंद त्यांनी आज तागायत जोपासले आहेत.बल्लारपुर इंडस्ट्रीज बल्लारपूर येथे असिस्टंट म्हणून ३२वर्षे सेवा बजावली . नौकरी करत करत कव्वालीच्या माध्यमातून त्यांनी समाज प्रबोधनाचे अंदाजे८००च्या वर कार्यक्रम केले.


प्रकाशित पुस्तके:

 सुबोध गीते ७भाग, शेरोशायरी २भाग,( भिमा कोरेगाव चा इतिहास)महार शौर्याची गाथा १भाग,एकुन १०भाग प्रकाशित आहेत.महार शौर्याची गाथा या पुस्तकासाठी महाराष्ट्रातून प्रचंड प्रतिसाद मिळाला असून १५अभिप्राय पत्रके मिळाली आहेत.त्यांचा अनेक ठिकाणी सत्कार झाला असून पुरस्कार, प्रशस्तीपत्र,व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला आहे. त्यांचे कव्वालीचे कार्यक्रम शाहीर नागोराव पाटणकर, सदाशिव दुपारे रायपुरवाले, रंजना शिंदे, प्रकाशनाथ पाटणकर,किरण पाटणकर यांच्यासह  अनेक नामवंत कलावंता सोबत  झाले.त्याकाळी सायकलीवर पेटी तबला हे साहित्य घेऊन गावोगावी,शहरोशहरी ते  प्रबोधनासाठी फिरले आजही ते सतत याकामी फिरत असतात.एक ध्येय वेडा व सळसळती प्रतिभा असलेला कवी म्हणून भाऊराव लोखंडे यांची ओळख आहे.त्यांचे जीवनच१९५६पासून गाणं,कवीता लिहण्यात व कव्वाली गाण्यात गेले .कव्वालीच्या क्षेत्रात केलेल्या कार्याचे श्रेय ते आपल्या पत्नीला देतात.पंजाब,नेपाळ, काठमांडू, बिहार, आंध्र प्रदेश,तेलगणा महाराष्ट्र इत्यादी अनेक ठिकाणी ते कवी संमेलनात  बाबासाहेबाच्या कविता ताकदीने सादर करतात . आदिलाबाद येथील वामनदादा कर्डक जयंती निमित्त कवी संमेलनात पहिल्यांदा दोन वर्षांपूर्वी भेट झाली होती. त्यांनंतर २५ॲागट२०२१रोजी साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे व  लोककवी वामनदादा कर्डक जयंती निमित्त आदिलाबाद येथील आंबेडकरी कलामहोत्सवात त्यांची व माझी दुसरी भेट झाली . या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते उपस्थित होते .मध्यंतरी त्यांच्या समवेत किनवट येथील उत्तम कानिंदे, रमेश मुनेश्वर, रुपेश मुनेश्वर,भीमराव पाटील,वसंत जगतकर व मी चहाचा घोट घेत घेत दिलखुलासपणे चर्चा केली असता  त्यांनी काही कवीता आम्हाला ऐकवल्या ... बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते धम्मदिक्षा घेऊन घरी आल्यावर त्यांनी काव्य लिहायला सुरुवात केली .त्यवेळची ती पहिली कवीता अशी आहे... 

२२प्रतिज्ञा  बाबासाहेबांच्या घेऊन मी पास झालो परीक्षा

माझे मला मिळाले जी नव्हती अपेक्षा

साक्षात भीम बघला मी दिक्षा भुमीवर

मग करु कशाला मी कुणाची प्रतिक्षा

ग्रंथ वेडा पंडित जागात एकमेव बाबासाहेब हे सांगताना ते म्हणतात.बाबासाहेब आंबेडकर यांचं पुस्तक जन्मापासून मरेपर्यंत कधीच सुटले नाही . जन्मापासून मरेपर्यंत पुस्तक म्हणून त्यांच्या वर एक त्यांनी गाणं लिहिलं..ते बाबासाहेब आंबेडकर यांना उद्देशून म्हणतात...जगात कुणालाच म्हणत नाहीत ग्रंथवेडा पंडित फक्त बाबासाहेबांनाच म्हणतात.

विश्वात एक माणसात नेक भीमराव रामजीआंबेडकर

असा झाला ना होईल कुणी ग्रंथ वेडा पंडित या भुवर

भुख ज्यांचे पुस्तक,सुख ज्यांचे पुस्तक

इष्ट मित्र पुस्तक, गणगोत पुस्तक

सहवासी पुस्तक,प्रवासी पुस्तक

हातात पुस्तक स्टेशनवर||१||

बायको पोरापेक्षाही आवडीचे पुस्तक

जिवलग जीवाचे संवगडी पुस्तक

उशीकडे पुस्तक,कुशीकडे पुस्तक

झोपेत पुस्तक छातीवर||२||

१८-१८तास तो करी लेखन वाचन

१३-१३वेळा लिहतो स्वत:चेच भाषण

उजवा हात थकला की लिहतो डाव्या हाताने

या पृथ्वीच्या पाठीवर||३||

घरी सब्जी भाजीतून काही पैसे वाचवून

कधीअर्धपोटी उपाशीच राहुन

खाऊन अर्धपोटी पुस्तकाच्यासाठी

मारतो घिरट्या दुकानावर||४||

अंतसमयी भाऊराव बाबासाहेब रडले

अजुन काही करण्यात कमी आयुष्य पडले

बौद्धमय भारत करण्याचे स्वप्न

साकार करील कोण नंतर||५||

मनपसंत गीते

१)लुंबीनी वनी,पालखीतुनी महारानी उतरली खाली

निसर्ग रम्य सौंदर्य सुगंध बहरली असे फुलवेली

फांदीला धराया,उंचाव,अनझटक्याने प्रसुत झाली

सिध्दार्थ जन्मला ती होती,वैशाखी पौर्णिमा.

२)धोका टाळायचा असेल विश्व युद्धाचा

तर धम्म जगाला घ्यावा लागेल बुध्दाचा

अडीच हजार वर्षांपूर्वी बुध्दाने

वदले होते युध्द वाढते युद्धाने

बोध घेतला नाही दुस-या युध्दाचा

तर धम्म घ्यावा लागेल बुध्दाचा

३)करतांना कर्म माणसा,जसा तु वागतो

जीवनाचा निकाल शेवटी तसाच लागतो

संदेश

आज घडीला बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा प्रचार व प्रसार व्हावा तसा होत नाही तो करण्यासाठी निष्ठावान कार्यकर्त्यांची गरज आहे.समाजामधून कार्यकर्ते तयार झाले पाहिजे असे प्रबोधनातुन भाऊराव सांगतात.     कव्वाल भाऊराव लोखंडे यांची वाटचाल अशीच  सदोदित चालत राहो ही मंगल कामना! धन्यवाद.


            महेंद्र नरवाडे,किनवट.

        मो.न.7066650366


No comments:

Post a Comment

Pages