विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षेतील तांत्रिक अडचणी दूर करा- काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाकडून निवेदन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 1 September 2021

विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षेतील तांत्रिक अडचणी दूर करा- काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाकडून निवेदन


     औरंगाबाद:- येथिल डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षेतील तांत्रिक अडचणी दूर करा, अशा मागणीचे निवेदन काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या वतीने डॉ. योगेश पाटील, परीक्षा नियंत्रण व मूल्यमापन विभाग यांना देण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद यांना निवेदन देण्यात आले की, मार्च/ एप्रिल २०२१ च्या पदवी आणि पदव्युत्तर परीक्षेत तांत्रिक अडचणी मुळे परीक्षे पासून वंचित राहिलेल्या परीक्षार्थींना एक संधी देण्यात यावी. कोरोना काळात अगोदरच विद्यार्थी व पालकांच्या तोंडचे पाणी पळालेले असतांना या परीक्षेत जर विद्यार्थी बसू शकला नाही तर परत परीक्षा शुल्क भान पालकांना शक्य होणार नाही. तरी विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थी हिताचा निर्णय घेत या विद्यार्थ्यांना एक संधी वजा मुभा द्यावी असे निवेदनात म्हटले आहे. निवेदन देतांना प्रा.शिलवंत गोपणारायन, सोशल मीडिया प्रमुख, काँग्रेस अनुसूचित जाती विभाग, किशोर सरोदे, अमरदिप हिवराळे,   चंद्रमुनी वाकळे, शरद खंदारे, सुरजशिंग राजपूत, मयूर महिरे आदी विद्यार्थी व पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages