शाहिद पतीच्या समाजसेवेचा वसा विरपत्नीने ठेवला अखंडित ; अनाथ मुलींच्या बाल गृहास गुरुजी फाउंडेशनमार्फत साहित्य वाटप - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 29 November 2021

शाहिद पतीच्या समाजसेवेचा वसा विरपत्नीने ठेवला अखंडित ; अनाथ मुलींच्या बाल गृहास गुरुजी फाउंडेशनमार्फत साहित्य वाटप

नांदेड/प्रतिनिधी

मुखेड तालुक्यातील आयटीबीपी चे  असिस्टंट कमांडंट शहीद सुधारकर शिंदे यांच्या परिवाराने त्यांच्या निधनानंतरही सामाजिक बांधिलकी जपत, गुरु जी फाउंडेशनच्या माध्यमातून शहरातील रामनगर भागातील अनाथ मुलींच्या बालगृहात विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्याचे वाटप करत वेगळा आदर्श निर्माण केला.


मुखेड तालुक्यातील बामणी गावचे भूमिपुत्र तथा आयटीबीपी असिस्टंट कमांडंट  सुधाकर शिंदे हे दि.२० ऑगस्ट २०२१ रोजी छत्तीसगड येथे झालेल्या नक्षली हल्ल्यात कर्तव्यावर असताना शहीद झाले होते. ते हयात असताना दरवर्षी आपल्या लग्नाचा वाढदिवस गरजूंना मदत करून साजरा करत असत. लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापासून त्यांनी गरजूना मदत करण्याचा सामाजिक उपक्रम राबवण्यास सुरुवात केली. मात्र दुर्दैवाने कर्तव्यावर असताना नक्षली हल्ल्यात ते शहीद झाले. त्यांच्या सामाजिक उपक्रमाची परंपरा पुढे चालू ठेवण्यासाठी त्यांच्या वीरपत्नी सुधा सुधाकर शिंदे यांनीही पुढाकार घेत गुरु जी फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक उपक्रम राबविला. त्यांनी शहीद जवान सुधाकर शिंदे यांच्या पश्चात दि.२९ नोव्हेंबर रोजी शहरातील हनुमानगड भागात असलेल्या अनाथ मुलींच्या बालगृहातील विद्यार्थीनाना वह्या, पेन, पुस्तक असे शालेय साहित्य व खाऊचे वाटप केले. तसेच दहावी आणि बारावी शिकणाऱ्या विद्यार्थिनींचे  परीक्षा शुल्क भरून विद्यार्थ्यांनीचा आनंद द्विगुणीत केला. वीरपत्नी सुधा सुधाकर शिंदे यांनी राबविलेल्या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. यावेळी शहीद जवान सुधाकर शिंदे यांचे सुपुत्र कबीर, मुलगी काव्या यांच्यासह गुरु जी फाउंडेशनचे यशपाल भोसले, बालगृहाचे संचालक अनिल दिनकर, अधीकक्षीका माया कदम यासह बालगृहातील विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

No comments:

Post a Comment

Pages